गोवा खबर

स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत चोडण येथे नेत्र तपासणी शिबीर

Published

on

Spread the love

गोवा खबर:आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मिशनचा एक भाग म्हणून चोडण भागात मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्टतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग दर्शवून उपलब्ध सेवांचा लाभ घेतला. यावेळी गरजवंताना मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले.

               यावेळी स्थानिक सरपंच श्री पंढरी वेंर्णेकर, परपेचूआ कुलासो, उप सरपंच, आयेशा वायंगणकर, तालुका नोडल अधिकारी श्री रविशंकर निपाणीकर, स्वयंपूर्ण मित्र आदी मान्यवर उपस्थित होते.

               गोव्यात स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत जोमाने काम सुरू असल्याबद्दल सरपंच श्री पंढरी वेंर्णेकर यांनी आनंद व्यक्त करून अधिकाधिक लोकांनी सरकारी योजनाचा फायदा करून घेण्याची विनंती केली.

Trending

Exit mobile version