क्रीडा खबर

जीएफडीसी शिवोली केंद्र शिबिराला विकाश धोरासू याची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर: फ्रान्सचा माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू विकाश राव धोरासू व अनिवासी भारतीय खेळाडूने गोवा फुटबॉल विकास केंद्राच्या शिवोली केंद्रातील शिबिराला भेट देऊन उदयोन्मुख खेळाडूंसह फुटबॉलचा आनंद लुटला. यावेळी जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर, स्थानिक पंच व इतर मान्यवर उपस्थित होते.

धोरासू हा 2006 साली फ्रान्सच्या विश्वचषक संघाचा सदस्य होता. या स्पर्धेत त्याला काही सामन्यांत मैदानावर उतरण्याची संधी देखील मिळाली होती. फुटबॉल खेळण्याचे स्वप्न कधीच भंग होणार नाही याची दक्षता घेत त्या दिशेने जाण्याचे आवाहन त्याने यावेळी केले.

‘तुम्ही स्वप्न पाहिले पाहिजे. पाहिलेल्या स्वप्नामध्ये विश्वास ठेवला पाहिजे. स्वप्न साकार होऊ शकते किंवा अपूर्ण देखील राहू शकतो. तुमच्याकडे असलेली क्षमता ओळखून फुटबॉल खेळल्यास तुमचे आयुष्य सुखकर होऊ शकते, असे धोरासू म्हणाला.

भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारेल व एक दिवस भारत विश्वचषकात खेळण्यासाठी नक्कीच पात्र ठरेल, असे धोरासू म्हणाला.
भेट दिलेल्या केंद्रावरील एखादा आम्हाला विश्वचषकात भारताकडून खे

ळताना दिसू शकतो. भारताला विश्वचषक यजमानपद भूषविण्याची संधी देखील भविष्यात मिळू शकते, असा विश्वास धोरासू याने व्यक्त केला.
आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीविषयी बोलताना धोरासू म्हणाला की, फुटबॉलमुळे माझे आयुष्य समृध्द झाले. इतरांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे, याची जाणीव मला झाली.

फुटबॉलने मला खूप काही दिले. त्यामुळे मी सुद्धा या क्षेत्राला देणे लागतो. मुलांना माझ्या अनुभवाचा फायदा मला करू द्यायचा आहे. भविष्यात फुटबॉल खेळणार्‍या मुलांची व मुलींची संख्या वाढल्यास याद्वारे खेळाचा दर्जा देखील वाढण्यास मदत होणार आहे, असे धोरासू म्हणाला.
अध्यापनशास्त्र व मानसशास्त्र पुस्तकांद्वारे शिकणे शक्य नाही. आहाराकडे लक्ष देतानाच शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार होणे गरजेचे आहे. दबाव झुगारून दबावाखाली खेळण्याची कला अवहत केली पाहिजे. या द्वारे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होतो, असे धोरासू म्हणाला.
‘चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्यासारखे भाग्य नसते. झिनेदिन झिदान हा विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी माझ्या सोबत राष्ट्रीय संघात होता. त्याच्यासोबत खेळण्याचा आनंद काही औरच होता.

गोव्यासोबत जोडता आल्यास फुटबॉलला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतात, असे धोरासू म्हणाला. आम्ही गोव्यासोबत नाते जोडण्याबाबत सकाळीच चर्चा करत होतो, असे धोरासू म्हणाला. भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड यशस्वी होऊ शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धोरासू असल्याचे जीएफडीसी अध्यक्ष ब्रह्रानंद शंखवाळकर यांनी सांगितले.

‘तो आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. भारतीय वंशाचा खेळाडू या स्तरापर्यंत जाऊ शकतो तर केंद्रांवरील ही मुले का जाऊ शकत नाहीत?, त्याने आपल्या कारकिर्दीत प्रचंड चढ उतार पाहिले आहेत. परंतु, त्याच्यात असलेली जिद्द, चिकाटी व प्रेम याच्यातून या मुलांना खूप काही शिकवून जाणारे आहे. फुटबॉल तुमचे आयुष्य घडवू ्शकते, असे शंखवाळकर म्हणाले.

जीएफडीसी सदस्य सचिव शांताराम नाईक, कॉलिन वाझ व प्रदीप चोडणकर देखील यावेळी उपस्थित होते.
या वेळी मुलांचा समावेश असलेले लहान-मोठे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. ज्यामध्ये ड्रिबलिंग, पासिंगचा समावेश होता. धोरासू याने यापूर्वी मुलांशी संवाद साधला. शिवोली केंद्राव्यतिरिक्त हळदोणा व सुकूर केंद्रावरील काही मुलेदेखील या प्रसंगी उपस्थित होती.
धोरासू व शंखवाळकर यांचा यावेळी सन्मानदेखील करण्यात आला.

सदर महोत्सव शिवोली-मार्ना ग्रामपंचायतीच्या बाल समितीने पुरस्कृत केला होता. जीएफडीसी शिवोली केंद्रप्रमुख ग्रेगरी डिसोझा यांनी प्रशिक्षक झीना सुवारिस व चिन्मय जल्मी तसेच सहकारी टोनी डायस याच्या मदतीने नियोजनबद्धरित्या यशस्वी केला.

Trending

Exit mobile version