गोवा खबर

गोवा विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा विद्यापीठ, दोनापावला येथे भौतिकशास्त्र आणि प्रायोजित विज्ञान शाळेची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पाला गोवा सरकारचे सहकार्य असून त्यावर अंदाजे ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. भौतिकशास्त्र आणि प्रायोजित विज्ञान विद्यालय भौतिकशास्त्र आणि प्रायोजित विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करील.

मुख्यमंत्र्यांनी गोवा बिझनेस स्कूलसाठी क्लासरूम अॅनेक्सीचे उद्घाटनही केले. या इमारतीत चार वर्गखोल्या आहेत आणि हा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाखाली या प्रकल्पासाठी सरकारने अंदाजे ३ कोटींचा खर्च केला आहे. गोवा विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले मानव संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. सरकार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करीत आहे आणि राज्याच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देऊ शकतील अशा उच्च कुशल व्यक्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदान करीत आहे.

या कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाचे  कुलगुरू हरिलाल मेनन आणि गोवा विद्यापीठाचे कुलसचिव श्री विष्णू नाडकर्णी हेही उपस्थित होते.

Trending

Exit mobile version