गोवा खबर

कुडतरी मतदारसंघातील पंचभाट येथील अनेक बेकायदा कामांचा आरजीकडून पर्दाफाश

Published

on

Spread the love
 पंचभाट क्षेत्रातील बेकायदा घरातील सांडपाणी रस्त्यावर, आर.जी. ची आरोग्य तसेच पंचायतीला तक्रार
गोवा खबर: रेव्होलुशनरी गोवन्सच्या कुडतरी मतदार संघाततील टीम ने कुडतरी पंचायतीतील पंच भाट ( कारगिल) क्षेत्रात परप्रांतीयाकडून बेकायदा डोंगर कापणी करून घरे बांधण्यात येत असल्याचे  लक्षात येताच सदर संबंधित खात्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच संदर्भात काल पंचायत व आरोग्य  विभागाकडून  संयुक्त तपासणी करण्यात आली होती.
या तपासणी दरम्यान आरोग्य खात्याला बेकायदेशीर पणे  बांधण्यात येणाऱ्या जवळ जवळ तीनशे घरामधील सांडपाणी गटारामध्ये सोडलेले असून ते भर रस्त्यावर सांडले जात असून, सर्वत्र दुर्गंधी  पसरलेली असून, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भयंकर त्रास होत आहे. दरम्यान या पंच भाट क्षेत्रात अजूनही बेकायदेशीर बांधकामे करण्याचे काम सुरूच असल्याचेही अधिकाऱ्यांना दिसून आले.
रेव्होलुशनरी गोवन्स चे रुबर्ट परेरा तसेच इतरांनी हीच अडचण लक्षात घेवून काही दिवसापूर्वी आरोग्य विभागाकडे तसेच पांचायातुकडे तक्रार दाखल केली होती. काल केलेल्या तपासणीत अनेक बेकायदेशीर गोष्टी समोर आलेल्या असून पंचायत तसेच आरोग्य खात्याकडून कडक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती संबंधित खात्याकडून देण्यात आली असल्याची माहिती रूबर्ट परेरा यांनी यावेळी सांगितली.

Trending

Exit mobile version