गोवा खबर

इयत्ता दहावीची परीक्षा १ एप्रिलपासून

Published

on

Spread the love

गोवा खबर: इयत्ता दहावीची दुसरी सत्र परीक्षा ०१ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार असून, ती २२ एप्रिल २०२३ पर्यंत चालेल, असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

ही परीक्षा राज्यातील ३१ परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येईल. एकूण २०४८९ विद्यार्थी (मुलगे – १०४११ व मुली – १००७८) ही परीक्षा देणार आहेत.

Trending

Exit mobile version