गोवा खबर

सांगे तालुक्यातील १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १८ मार्च रोजी विद्युतभारित

Published

on

Spread the love

गोवा खबर:नागरिकांना कळविण्यात येत आहे की, सांगे तालुक्यातील आंतोरी, सावर्डे-गोवा येथील नव्याने उभारण्यात आलेली ११ केव्ही सिंगल लाईन सर्किट वाहिनी आणि १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १८ मार्च २०२३ रोजी विद्युतभारित करण्यात येणार असून त्यानंतरही ती भारित राहील.

तसेच, आंबेउदक, सावर्डे-गोवा येथील नव्याने उभारण्यात आलेली ११ केव्ही सिंगल लाईन सर्किट वाहिनी आणि १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १८ मार्च २०२३ रोजी विद्युतभारित करण्यात येणार असून त्यानंतरही ती भारित राहील.

तसेच, धारबांदोडा ग्रामपंचायतीतील सड्यार, दावकोंड, धारबांदोडा-गोवा येथील नव्याने उभारण्यात आलेली ११ केव्ही सिंगल लाईन सर्किट वाहिनी आणि १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १८ मार्च २०२३ रोजी विद्युतभारित करण्यात येणार असून त्यानंतरही ती भारित राहील.

सर्व जनतेला या वाहिन्यांपासून, उपकरणांपासून, खांबांपासून, दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाहिन्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क जीविताला व मालमत्तेला हानी पोहोचविणारा ठरू शकतो असे कळविण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version