गोवा खबर: भारतातील एक प्रतिष्ठित क्लब असलेल्या एफसी गोवा क्लबला बेंगळुरू एफसीसोबत 2022-23 हंगामासाठी युवा आणि तळागाळातील भारतीय फुटबॉलच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल हिरो आयएसएल ग्रासरूट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोवा येथे शनिवारी झालेल्या आयएसएल स्पर्धेच्या फायनलनंतर एका विशेष समारंभात अवॉर्ड आणि 10 लाखांचे रोख पारितोषिक देऊन एफसी गोवा क्लबचा सन्मान करण्यात आला. एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी हा पुरस्कार स्विकारला.
“मला एफसी गोवाची मानसिकता आवडते. केवळ प्रसिद्ध आणि अनुभवी खेळाडूंना करारबद्ध करण्यावर त्यांचा भर नसतो. खेळाडूंच्या विकासाला ते तितकेच महत्त्व देतात. गेल्या उन्हाळ्यात क्लबचे मुख्य प्रशिक्षक स्विकारण्यामागील हे एक मुख्य कारण आहे.
“तरुण खेळाडूंसह मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्याशी संयम राखणे आणि हे असे काहीतरी आहे जे व्यावसायिक फुटबॉलमध्ये सहज घडत नाही,” असे पेना यांनी यावेळी बोलून दाखवले.
कम्युनिटी विंग गौर्ससह फोर्का गोवा फाऊंडेशनने लिटिल गौर्स लीग सुरू केली आहे. ही भारतातील सर्वात मोठी बेबी लीग आहे. स्पर्धेचा यंदाचा हंगाम हा चौथा हंगाम आहे. लीगच्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये 6, 8, 10 आणि 12 वर्षांखालील श्रेणींमध्ये 1000 हून अधिक मुले (200 पेक्षा जास्त मुली सहभागींसह) सहभागी झाले आहेत.
एफसी गोवाने2017 मध्ये आपली पूर्ण युवा रचना सुरू केली, गेल्या काही वर्षांत त्यांच्या संघांनी गोवा प्रो-लीग आणि पोलीस चषक स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जेतेपद पटकावले आहे.
गौर्सनी, या मोसमात 17 वर्षांखालील संघाने गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) थर्ड डिव्हिजन (बार्डेझ झोन) विजेतेपद पटकावले. त्यांच्या 15 वर्षांखालील आणि 13 जीएफए संघाने आपापल्या जीएफए चॅम्पियनशिपमध्ये खात्रीशीर विजय मिळवले.13 वर्षांखालील आणि 15 वर्षांखलील संघांनी त्यांच्या 8 सामन्यांतून अनुक्रमे 95 आणि 45 गोल केले. प्रत्येकी 5 गोल खाल्लेत.