गोवा खबर

मुख्यमंत्र्यांनी पर्रिकर यांना वाहिली श्रद्धांजली

Published

on

Spread the love

माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या ४थ्या पुण्यतिथीनिमित्त आज, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेचे नेतृत्व करत,  मिरामार येथील स्मृती स्थळावर, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. सावंत यांच्यासह कामगार आणि रोजगार मंत्री, श्री. आंतानसिओ मोन्सेरात यांनी मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समाधीला आदरांजली वाहिली.

यावेळी पर्येच्या आमदार, डॉ. देविया राणे, ईडीसीचे अध्यक्ष, श्री. सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव, श्री. अजित रॉय, आयएएस, पोलिस महासंचालक, श्री. जसपाल सिंग, आयपीएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, मामू हागे, आयएएस, पर्रीकर यांचे पुत्र, श्री. उत्पल पर्रीकर, सचिव, उपसचिव आणि सरकारी प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version