गोवा खबर : गोवा राज्य नियुक्त जीवरक्षक एजेन्सी दृष्टी मारिन या संस्थेने आपल्या बचावकार्यात नाविन्यता आणण्यास एआईचा वापर केला आहे. औरस आणि ट्रायटॉन ही द्रीष्टीद्वारे स्वीकारलेली नवी एआई पावर्ड मॉनिटरिंग मशीन आहे.
हा एआई समुद्रावर घडणाऱ्या धोक्यांचे निरीक्षण करू शकतो , ही टेकनॉलॉजि समुद्रकिनाऱ्यावर अवती भवती घडणाऱ्या गोष्टींचे विलक्षण सुद्धा करण्यात मदत करणार , औरस हा एक दृष्टीने स्वात बनवलेला सेल्फ ड्रायविंग रोबोट आहे जो मोट्या प्रमाणात नॉन-स्विम झोनमध्ये गस्त घालून पर्यटक व जीवरक्षकांना सतर्क करतो , तसाच हा आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांना मदत करण्यासाठी विकसित केला आहे , गस्त घालण्यापासून ते बहुभाषिक सूचना देण्यापर्यंत हा एआई वापरला जाणार आहे
औरस १०० किलो पर्यंत वजन उचलू शकतो आणि आता पर्यंत समुद्रकिनाऱ्यावर किमान १३० किलोमीटर चालला आहे अशी खात्री करण्यात अली आहे
तसेच ट्रायटन ह्या एआई सिस्टमचे प्राथमिक लक्ष नॉन-स्विम झोनचे पूर्णपणे एआई आधारित निरीक्षण प्रदान करणे आणि पर्यटकांना व जीवरक्षकांना धोक्यांची सूचना देणे आहे, तसेच समुद्रकिनाऱ्यांचे सर्व काही कव्हरेज देण्यासाठी ती औरस सोबत काम करेल , यासोबत ते नॉन स्वीमझोनमध्ये गस्त घालणार , जीवरक्षकांना माहिती देणार, हस्तांतरित करेल आणि त्यांना समुद्रात भरतीच्या वेळी आणि धोक्याच्या प्रवण भागात पाण्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना ओळखण्यास मदत करेल.
समुद्रकिनाऱ्यावरील व्यक्तींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मनुष्यबळाला अधिक प्रभावी होण्यास आणि त्यांच्यावरील जोखीम कमी करण्यासाठी नवीन तंत्रन्यानाचा जीवरक्षक वापर करणार असे नवीन अवस्थी यांनी सांगितले , तसेच या विषयावर पुढे बोलताना ” जसजसा समाज तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून येत , तसतसे ते जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये योग्य रित्या लागू करणार असे पण त्यांनी सांगितले.
औरस हा उत्तर गोव्यात मिरामार या समुद्रकिनाऱ्यावर वापरला जात आहे आणि ट्रायटन हा बाईणा, वेल्साउ , बेणाउलिम आणि मिरामार येथे वापरला जात असून तोच पूर्णपणे द्रीष्टी कंट्रोल रूमद्वारे नियंत्रित केला जात आहे. दृष्टी या वर्षी १०० ट्रायटन युनिट्स आणि १० औरस युनिट्स गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्याचा प्रयत्न करत आहे