गोवा खबर

प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे १७ रोजी गोव्यात स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क व्याख्यान

Published

on

Spread the love
गोवा खबर:महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते, कोकणचे सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे गोव्यातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय स्पर्धा परीक्षा संदर्भात नि:शुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. कोणतेही मानधन अथवा प्रवास भत्ता न घेता विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांचे हे समाजकार्य अविरत सुरू आहे. त्यांनी आजवर शेकडो व्याख्याने घेतलेली आहेत.
शनिवार, दिनांक १७ डिसेंबर २०२२
सकाळी ८ वा.
सरकारी माध्यमिक विद्यालय, नावेली, साखळी, गोवा
सकाळी ११.०० वा.
होंडा माध्यमिक विद्यालय, सत्तरी, गोवा
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांना 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version