गोवा खबर

नवा असोसिएट स्पॉन्सर मॅक्डोवेल नं. 1 सोडाचे एफसी गोवाकडून स्वागत

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: प्रतिष्ठित एफसी गोवाने हिरो इंडियन सुपर लीगच्या 2022-23 हंगामासाठी नवा असोसिएट स्पॉन्सर म्हणून भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड असलेल्या मॅक्डोवेल नं. 1 सोडाची नियुक्ती केली आहे. क्लबने नव्या असोसिएट स्पॉन्सरचे स्वागत करताना, हा ब्रँड संपूर्ण हंगामात मैत्री आणि सौहार्द वाढवणारा प्रमुख घटक असेल, असे म्हटले आहे.

 

एफसी क्लबच्या चाहत्यांना घरी किंवा स्टेडियमध्ये त्यांच्या मित्रांसोबत खेळाचा संपूर्ण आनंद लुटता येईल, यासाठी मॅक्डोवेल नं. 1 सोडा प्रयत्नशील राहील, या कराराचा मुख्य उद्देश आहे. या भागीदारी अंतर्गत मॅक्डोवेल नं. 1 सोडा कंपनीचा लोगो एफसी क्लबच्या खेळाडूंच्या टी-शर्टच्या वरच्या बाहीवर दिसेल.

 

एफसी गोवाचे उपाध्यक्ष रवी पुस्कुर क्लबच्या कराराबाबत सांगितले की, मॅक्डोवेल नं. 1 सोडा कंपनी ही  भारतातील सर्वात ओळखल्या जाणार्‍या ब्रँडपैकी एक आहे आणि कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रेशनशी ते जोडलेले आहेत. या कराराच्या माध्यमातून आम्ही यंदा आमच्या चाहत्यांना स्टँडमध्ये फुटबॉलचा आनंद साजरा करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देउ.

 

चाहत्यांना त्यांचा आवडता फुटबॉल संघ, सुंदर खेळ आणि त्यासोबत येणारे क्षण साजरे करण्यासाठीची कारणे उपलब्ध करणे, हे आमचे ध्येय राहिलेले आहे. आम्ही संपूर्ण सीझनमध्ये ब्रँड्सना सहकार्य करण्यासाठी आणि सर्वांना यश मिळवून देण्यासाठी अनेक समन्वय शोधण्यात सक्षम होऊ, असा विश्वास पुस्कुर यांनी व्यक्त केला.

 

फुटबॉल हा सांघिक खेळ आहे आणि मैदानावर तसेच मैदानाबाहेर खेळीमेळी आणि सौहार्द ही महानता आहे. यंदाच्या आयएसएल सीझनपासून  मॅक्डॉवेलचा नंबर 1 सोडा, एफसी गोवाच्या सहकार्याने, मैत्रीची सेलेब्रेशनचा एक भाग असेल.

 

मॅक्डॉवेलचा नंबर 1 सोडा प्रमाणेच ’यारी’ च्या खर्‍या ब्रँड्सच्या भावना सामायिक करतो आणि एकत्रितपणे, आम्ही या हंगामात ग्राहक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय क्षण घडवून आणण्यासाठी उत्सुक आहोत, असे डाएजिओ इंडियाच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ हेड (मार्केटिंग) रुचिरा जेटली यांनी म्हटले.

Trending

Exit mobile version