गोवा खबर:गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे –
“गुरु नानक देवजींच्या जयंतीनिमित्त मी आपल्या देशवासियांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभ कामना व्यक्त करतो.
आपल्या देशाचे भाग्य आहे की, सत्य, करुणा आणि सदाचार या सार्वत्रिक गुणांच्या एकसूत्रीने बांधलेल्या मानवजातीचे अंगभूत ऐक्य जागृत करणाऱ्या गुरु नानक देवजींसारख्या महान गुरुजनांकडून देशाला आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शन मिळाले.
गुरु नानक देवजी यांच्यासारख्या अन्य गुरूंच्या आणि आचार्यांच्या ज्ञानामुळे भारताला विश्वगुरू म्हणून प्रतिष्ठा मिळाली.त्यांनी आपल्याला करुणामय सदाचारी जीवनाचा आणि सर्वसमावेशक समाजाचा मार्ग दाखवला.त्यांनी आपल्या नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणीतून समतेची मूल्ये समाजात रुजवली.त्यांचे शबद -साखी, त्यांचे संपूर्ण वाङ्मय , हा सर्व मानवजातीचा शाश्वत आध्यात्मिक वारसा आहे.
गुरू नानक देव यांचा चिरंतन संदेश आपल्याला एक करुणामय , संवेदनशील आणि शांततामय जग निर्माण करण्याच्या मार्गावर मार्गदर्शन करेल. ”
या संदेशाचा हिंदी मजकूर खालीलप्रमाणे –
“गुरु नानक देव जी की जन्म जयंती के शुभ अवसर पर देशवासियों तथा विदेशों में रह रहे प्रवासी भारतीय समुदाय को हार्दिक बधाई तथा शुभ कामनाएं!
हमारे देश का यह सौभाग्य रहा कि उसे गुरु नानक देव जी जैसी विभूतियों से आध्यामिक और नैतिक मार्गदर्शन प्राप्त हुआ जिन्होंने अखिल मानवता की उस अंतर्निहित एकता को उजागर किया जो सत्य, करुणा और सदाचरण जैसे सार्वभौमिक गुणों से एकसूत्र में बंधी रही है। गुरु नानक जी जैसे आचार्यों और गुरुजनों के सात्विक ज्ञान के कारण ही भारत को विश्वगुरु के रूप में प्रतिष्ठा मिली। उन्होंने हमें एक पवित्र संवेदनशील जीवन तथा एक समावेशी समाज की राह दिखायी। उन्होंने अपने नैतिक और आध्यात्मिक उपदेशों से समाज में समानता के संस्कार डाले। उनके शबद -साखी, उनका सम्पूर्ण वांग्मय, सारी मानवता की शाश्वत आध्यात्मिक धरोहर हैं। उनका कालजयी संदेश, एक करुणामय, संवेदनशील और शांतिपूर्ण विश्व के निर्माण हेतु हमारा मार्गदर्शन करे।”