गोवा खबर

मंदिरांत सादर केलेले संगीत व नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते : संशोधनाचा निष्कर्ष

Published

on

Spread the love
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये शोधनिबंध सादर !

 गोवा खबर: प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवतांसमोर कलाकारांनी कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येत असे आणि त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असेम्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होतीमंदिरांमध्ये सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देऊ शकतेअसा संशोधनाद्वारे काढण्यात आलेला निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्रीशॉन क्लार्क यांनी मांडला

प्रसिद्ध इंडोलॉजिस्ट आणि नवी देहली येथील भारतीय विद्या भवनच्या ‘के.एममुन्शी सेंटर’चे डीन डॉशशी बाला यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यक्रमात (वेबिनारते बोलत होते. ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या उत्पत्तीमध्ये भारतीय मंदिरांचे महत्त्व’ या विषयावर शोधनिबंध श्रीशॉन क्लार्क आणि सौश्वेता क्लार्क यांनी ऑनलाइन सादर केला.  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेततर  श्रीशॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

 शॉन क्लार्क पुढे म्हणाले कीएका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील साधकांनी एका प्राचीन शिवमंदिरात भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केलेयुनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यु..एस.) वापरून कलाकारशिवलिंग आणि भगवान शिवाची प्रतिमा यांची प्रभावळ मोजण्यात आलीकार्यक्रम सादर केल्यानंतर या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळले

या वेळी देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकर्षित झाल्याने देवतेच्या प्रतिमेच्या प्रभावळीत सर्वांत जास्त वाढ झाल्याचे आढळलेदुसर्‍या एका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील एका साधकाने श्री दुर्गादेवीचे मंदिरएक सभागृहआध्यात्मिक संशोधन केंद्राचा स्टुडिओ आणि आश्रम येथे एक भजन गायलेआश्रम आणि मंदिर येथील सादरीकरणाच्या वेळी गायकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळलेतर सभागृहातील सादरकरणाच्या वेळी सकारात्मक प्रभावळ अल्प झाल्याचे आढळलेयाचे कारण असे कीमंदिर आणि आश्रम हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि तेथे भजने गायल्याने सकारात्मकता वृद्धिंगत होतेतर प्रेक्षागृहे ही केवळ मनोरंजनासाठी वापरली जातात.

Trending

Exit mobile version