गोवा खबर

कामाक्षी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्सचे नवोदित शेफांचे राज्यभरात वाहवा

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: अलीकडे झालेल्या झालेल्या राज्यस्तरीय पाककला स्पर्धेमध्ये गोवा विद्यापीठ सलग्न  वर्ण स्थित कामाक्षी कॉलेज या संस्थेला विजयी घोषित करण्यात आले आहे. गोवा फूड अँड हॉस्पिटॅलिट अँड कलनरी फोरम ऑफ गोवा आणि ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवा हे या स्पर्धेत कमक्षी कॉलेजचे प्रतीस्पर्धक   होते.

तर विद्यार्थ्यांनी बडिंग शेफ  ऑफ गोवा २०२२ मध्ये भाग घेतला होता , ज्यात तक्ष भंडारी आणि आश्लेषा एन मल्ल्या हे प्रथम आले, शेफ मिग्यूएल आरकांझोप रोलिंग ट्रॉफी फॉर गोवा स्टूडेंट ऑफ द यर  अवॉर्ड २०२२ मध्ये, विद्यार्थ्यांना ३  कोर्सचे जेवण बनवावे लागले ज्यात राहुल  प्रथम स्थान पटकावले, तर वेडिंग केक डिस्प्ले श्रेणीत अनेद्रा वेलांका बार्बोसा यांनी यश मिळवले, नायजला फुर्ताडोला गोअन कुझिनमध्ये रौप्य पदक मिळाले तसेच शनाया लोबो यांनी पाककला स्पर्धेत अव्वल पदक पटकावले.

शेफ पॅट्रिक अल्बर्ट या फॅकल्टी टीममध्ये हेड फॅकल्टी शेफ आहे, ज्यांच्याकडे प्रतिष्ठित मैत्रिय कुझिनेर  डी फ्रान्स ही पदवी देखील आहे, तर ह्याच संधर्भात बोलताना ते म्हणाले “ कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षांतच आंतर- महाविद्यालययीन स्पर्धांमध्ये आघाडीवर राहिलो आहोत आणि इतर विविध राज्यस्तरीय कूक ऑफ मध्ये  विजेतेपदाचा दावा करत आहोत. तर ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझ्या कॉलेजचे

प्रतिनिधित्व करताना खूप आनंद झाला,  विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी अशा अनेक संधी  दिल्या जातात ज्यासाठी आम्ही आभारी आहोत असे राहुल मूल्ये यांनी जोडले.

कामाक्सी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्स पाककला व्यवस्थापनामध्ये ३ वर्षांचा पदवी कार्यक्रम देते. संस्था, तिच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षात असताना अनेक राज्यव्यापी पाककला स्पर्धांमध्ये जिंकली आहे.

Trending

Exit mobile version