गोवा खबर

रेईस मागुस मध्ये आरजीच्या साईनाथ कोरगावकर यांनाच जनतेचा कौल :मनोज परब.

Published

on

Spread the love
गोवा खबर: मुख्यमंत्री सावंत यांनी आरजीवर केलेली टीका ही निराधार आहे. आरजीने कधीच सरकारच्या विकास कामात अडथळे आणले नाहीत. उलट गोवेकरावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवला आहे. काल प्रमोद सावंत यांनी राज्यातील युवकांना दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे जे आश्वासन दिले आहे ते फक्त नाटक असून, आजपर्यत मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार गोव्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अयशस्वी ठरले आहे. मुख्यमंत्री फक्त परप्रांतियांना सरकारी तसेच खासगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देत असल्याची टीका आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केली.
दोन दिवसापूर्वीच रेईश मागुस इथे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उमेदवाराचे कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट ताणावडे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकाराशी बोलताना त्यांनी रेव्होलुशनरी गोवन्सवर विविध विकासकामांना सतत अडथळे आणत असतात अशी टीका केली होती. त्याला प्रतुत्तर म्हणून परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.
रेईस मागुस सारख्या मतदारसंघात अनेकांचे पोट हे टॅक्सी व्यवसायावर चालते परंतु, आज राज्य सरकार राज्यात ओला, उबर सारख्या टॅक्सी कंपनी ज्या कर्नाटक राज्यात जिथे बीजेपी चेच सरकार आहे तिथे बंधी घालण्यात आली आहे, परंतु त्याच कंपनीला इथे गोव्यात व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात येथे. अशा तऱ्हेने मुख्यमंत्री व त्यांचे सरकार टॅक्सी चालकावर अन्याय करत आहे, तसेच राज्यात राज्य सरकार जेटी कोळश्या सारखे मोठमोठे  हानिकारक प्रकल्प आणून डोंगर, शेत नष्ट करत असून, ते गोव्यातील मासेमात्यांच्या पोटावर सुद्धा पाय ठेवत असल्याचे मनोज परब यांनी म्हटले.
पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, बीजेपी ने जी खोटी वार्ता पसरवली की आर. जी. चे कार्यकर्ते भाजप मध्ये गेले, ती बातमी खोटी असून, आर. जी पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते नसून क्रांतिकारी आहेत जे सतत आपल्या गोवा राज्य वाचविण्यासाठी कार्यरत असतात. कोणीही आर. जी. पक्षात दोन दिवस काम करण्याचे नाटक करणार व स्वताला कार्यकर्ता म्हणणार असे होणार नाही. आमचे क्रांतिकारी हे सतत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याईतके स्वार्थी, मतलबी नसून, प्रत्येक क्रांतिकाऱ्याच्या हृदयात गोवा वाचवण्याचा उद्देश आहे.
आज रेइश मागुस इथे बीजेपी ने उभा केलेला उमेदवार हा फक्त पैसा आणि राजकीय शक्ती याला बघतो. त्याला गोवेकराबद्दल काहीच मतलब नाही. यापूर्वीही दिल्ली इथल्या बिल्डर ल घेवून ह्या मतदारसंघातल्या देवाचा खुरीस पाडण्यात आला, तसेच तिथल्या लोकांची पारंपारिक पायवाट सुद्धा बंद केली गेली होती. रेइश मागुस इथे बीजेपी ने ठेवलेला  जिल्हा पंचायत उमेदवार याची पत्नी सरपंच तसच भाऊ पंच आहे अशा तारेचे फॅमिली राज चालू असल्याचे त्यांनी म्हटले.
रेइश मागुस येथील स्थानिक आमदार केदार नाईक यांनी आपण कधीच पक्षांतर करणार नाही असे म्हटले होते, बांबोली इथल्या फुलांच्या खुरिस तसेच पणजीतील महालक्ष्मी देवी पुढे सुद्धा त्याने खोटं बोलून देवाची मस्करी केली आहे,तसेच निवडून आणलेल्या जनतेचा विश्वासघात केला आहे. असे असताना सुद्धा आज ते परत जनतेपुढे कसे काय मतांची भीक मागायला जातात असे मनोज परब म्हणाले.
यापुढे  रेइश मागुस मतदारसंघातील जनता आमच्या साईनाथ कोरगावकर या उमेदवाराला निवडून आणून, जे आज बीजेपी सरकारतसेच लोकांची दिशाभूल करणाऱ्या पक्षाना धाड शिकविल असा विश्वास परब यांनी यावेळी बोलून दाखवला.

Trending

Exit mobile version