गोवा खबर

विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या दूर करण्यासाठी विद्यापीठात पूर्णवेळ समुपदेशक नेमण्याची एनएसयूआयची मागणी 

Published

on

Spread the love
 गोवा खबर:आपण जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करत आहोत. मानसिक तणाव ही देशातील मोठी समस्या आहे. केवळ तारे-तारकाच नाही तर विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात या समस्या येत असतात.  एनजीओपासून जागतिक आरोग्य संघटनेपर्यंत अनेक पातळ्यांवर याविषयी काम झाले आहे. असे एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी यावेळी सांगितले.  
गोवा विद्यापीठ परिसरात विद्यार्थी मानसिक तणावामुळे येणाऱ्या नैराश्याला सामोरे जात आहेत. राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. ते ते विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचारही करत नाहीत. विद्यापीठ परिसरात २ हजार हुन अधिक विद्यार्थी आहेत. मात्र समुपदेशक केवळ आठवड्यातून दोनदा भेट देतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांची पूर्णवेळ नेमणूक करण्याची आवश्यकता आहे.
उच्च शिक्षण विभागाचे सहायक संचालक कौस्तुभ कामत यांची आम्ही भेट घेतली व त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी पूर्णवेळ समुपदेशकाची मागणी केली. कोविड महामारीच्या काळात एकही समुपदेशक नव्हता. कोविडनंतर अनेक विद्यार्थी मानसिक अस्वास्थ्याला सामोरे जात आहेत.
यावर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची संकल्पना ‘मानसिक आरोग्य आणि सर्वांचे कल्याण जागतिक प्राधान्य’ अशी आहे. अधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे अनुसरण करत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व कल्याणासाठी काम केले पाहिजे. तसेच याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.  आम्ही एनएसयूआय गोवा सरकारकडे मागणी करत आहोत, विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या समस्यांना सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. आणि त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य द्यावे. एनएसयूआय अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले.
शेन रेबेलो कुठ्ठाळी गट अध्यक्ष यावेळी म्हणाले, ‘आम्ही केवळ निवडणूक काळात सक्रिय होणारी विद्यार्थी संघटना नाही. आम्ही पूर्णवेळ विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी काम करणारी विद्यार्थी संघटना आहोत. जी सातत्याने विद्यार्थ्यांना सहकार्य करते. बहुतेक विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असताना  आम्ही बघत आहोत. मात्र इतर कोणत्याही विद्यार्थी संघटनेने हा मुद्दा उचलला नाही. कारण ते केवळ राजकारण करतात. मात्र एनएसयूआय हा मुद्दा उचलत असून विद्यापीठाकडे पूर्णवेळ समुपदेशकाची मागणी करत आहे.

Trending

Exit mobile version