गोवा खबर

गुदिन्हो यांच्याहस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर:वाहतूक मंत्री माविन गोदिन्हो यांनी आज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पर्वरी गोवा येथे स्टार्ट अर्ली, ड्राईव्ह डिफेन्सिव्हली, रिच सेफली या संकल्पनेवर ११ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२२ चे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना श्री गुदिन्हो यांनी रस्ते अपघातांची संख्या वाढण्यामागे ४ प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे ओव्हर स्पीडिंग, रस्त्यावर नियम आणि कायदे न पाळणे , एडवेंचर वाहन चालविणे आणि मुख्य समस्या म्हणजे  दारू पिऊन गाडी चालवणे असे सांगितले. त्यांनी सर्वसामान्यांना अधिक शिस्तबद्ध राहून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि या नियमांच्या सकारात्मक पैलूंकडे पाहिले पाहिजे. ते जनतेच्या भल्यासाठी बनविले जातात अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

त्यांनी गोव्यात वाहतूक विभाग एक नवीन नियम लागू करणार आहे ज्यामध्ये बार आणि रेस्टॉरंट्सने त्यांच्या ग्राहकांना मद्यपान करून परत जाण्याची परवानगी देऊ नये तर त्यांना टॅक्सीने पाठवावे अशी माहिती दिली. ही त्यांची जबाबदारी असली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे यांनी सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहतूक खात्याच्या अथक सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. रस्ते अपघात टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काम करणे आणि जनजागृती करणे आणि रस्ता सुरक्षेबाबत समाजाचे प्रबोधन कसे करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

यावेळी वाहतूक सचिव श्री. सुभाष चंद्र आयएएस, वाहतूक संचालक श्री. राजन सातार्डेकर, प्राचार्य आयएचएम श्रीमती डोना डिसूझा व इतर मान्यवर उपस्थित होते.

Trending

Exit mobile version