मडगावचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते BLive च्या गोव्यातील पहिल्या मल्टि-ब्रॅण्ड स्टोअरचे उद्घाटन. गोव्यातील वाहतुकीसाठी विद्युत वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या उपक्रमाच्या अनुषंगाने स्टोअरचे उद्घाटन
गोवा खबर: भारताचा विद्युत वाहनविक्रीसाठीचा सर्वात वेगाने विकसित होत असलेला ब्रॅण्ड BLiveने गोव्यातील मडगावमधील आर्लेम येथे आपले पहिले मल्टी-ब्रॅण्ड एक्स्पिरियन्स स्टोअर सुरू केले असून मडगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री श्री. दिगंबर कामत यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला. इंधनाच्या वाढत्या किंमती आणि कार्बन उत्सर्जनाचे वाढते प्रमाण कमी करण्याविषयी लोकांमध्ये येत असलेल्या जागरुकतेमुळे या ब्रॅण्डला भारतातील आपले हे २०वे एक्स्पिरियन्स स्टोअर उघडण्याची प्रेरणी दिली आहे.
गोव्यातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण संपूर्ण देशाच्या सरासरी कार्बन उत्सर्जनाच्या तीनपट आहे, स्वमालकीच्या गाड्यांचे प्रमाण माणशी ४.५ पट आहे, तर दर व्यक्तीमागे विजेच्या वापराचे प्रमाण हे दुप्पट आहे. गोव्यासाठी आखण्यात आलेला मल्टि-सेक्टरल स्टेट एनर्जी अॅक्शन प्लॅन (ईएपी) आणि डिसिजन सपोर्ट टूल (डीएसटी) विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आधाररेषा मूल्यमापन अहवालानुसार येथील हवामानाची नाजूक स्थिती हा गोव्यासाठी पुनर्नविकरणीय ऊर्जा धोरणाची आवश्यकता वाढविणारा आणखी एक पैलू आहे.
BLiveEV स्टोअर व्यापक ईव्ही ब्रॅण्ड्स देण्यासोबत एकाच छताखाली सुलभ फायनान्स व उत्तम ऑफर्स देते. हे स्टोअर ई-स्कूटर्स, सायकल्स, मोटरसायकल्स व डिलिव्हरी वेईकल्सच्या श्रेणीसाठी प्रतिमहिना २,००० रूपये इतक्या कमी ईएमआयमध्ये ईव्ही देते. आम्ही नवीन अपग्रेडेड मॉडेल्ससाठी एक्स्चेंजमध्ये जुन्या ईव्ही देखील स्वीकारतो. २० हून फ्रँचायझी मालकीच्या स्टोअर्सच्या नेटवर्कसह BLiveने २५०० हून अधिक कुटुंबांना व व्यवसायांना इलेक्ट्रिक परिवहनाचा अवलंब करण्यास मदत केली आहे.
कायनेटिक ग्रीन, टेको लेक्ट्रो, Gemopai, एलएमएल- डेटेल, ई-मोटोरॅड, हीरो इलेक्ट्रिक असे प्रमुख ब्रॅण्डस् सध्या BLiveच्या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. ग्राहक स्टोअर्समध्ये नवीन बॅट:आरई स्टोरीचा अनुभव घेऊ शकतात, जी स्टायलिश लुक्स असलेली बहुप्रतिक्षित हाय-स्पीड ईव्ही आहे. ही स्मार्ट व नवान्मेष्कारी ई-बाइक बॅट:आरई श्रेणीमधील अद्वितीय वेईकल आहे.
BLive चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक समर्थ खोळकर म्हणाले, ‘’आम्ही गोव्यामधील स्टार्टअप आहोत आणि आम्हाला गोव्यातील प्रत्येक व्यक्तीला ईव्हीचे मालक होण्यास, तसेच हवामान बदलाच्या आव्हानांचे निराकरण करण्यास समक्ष करण्याचा अभिमान वाटतो. आम्हाला गोव्यामध्ये आमच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन करताना आनंद होत आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना ईव्ही ‘ट्राय अॅण्ड बाय’ करण्याची, घरामध्येच प्रात्यक्षिक अनुभवण्याची आणि सुलभ फायनान्स पर्यायांसह उत्तम ऑफर्सचा लाभ घेण्याची सुविधा मिळेल. आम्ही इलेक्ट्रिक वेईकल्सबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबत मालकीहक्क सक्षम करण्याकरिता गोव्यामध्ये ३ ते ४ आणखी फ्रँचायझी स्टोअर्स स्थापित करण्यास उत्सुक आहोत.’’
गोव्यातील या नव्या स्टोअरद्वारे BLive हरित तंत्रज्ञान ग्राहकांच्या अधिक जवळ घेऊन येत आहे व त्यायोगे शून्य कार्बन उत्सर्जनाचे जागतिक उद्दीष्ट साध्य करण्यामध्ये सहभागी होत आहे. हे स्टोअर ग्राहकांना EV वापराचा प्रत्यक्ष अनुभव तर देणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सोयीनुसार निवड करण्यासाठी विविध प्रकारच्या ब्रॅण्ड्स आणि डिझाइन्सचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. या नव्या ठिकाणी इन-स्टोअर क्विक सर्व्हिस किऑस्क, बॅटरी स्वॅपिंगची सुविधा आणि EV चार्जिंग यंत्रणेचा समावेश असणार आहे. शिवाय हे स्टोअर ब्रॅण्डचे कस्टमर एक्स्पिरियन्स सेंटरही असेल. या सर्व सोयीसुविधांच्या जोडीला या स्टोअरद्वारे EV देखभालीसाठी रोडसाइड असिस्टन्स, सुलभ वित्तपुरवठ्याचे पर्याय, सर्वसमावेशक सर्व्हिस पॅकेजेस आणि ई-वाहनांचे सुटे भाग मिळण्याची सोय अशा सर्व प्रकारच्या विक्री-पश्चातच्या सेवाही पुरविल्या जाणार आहेत. या एक्स्पिरियन्स स्टोअरच्या माध्यमातून BLive आपल्या ग्राहकांना आगळावेगळी फिजिटल अनुभव मिळवून देणार आहे, जेणेकरून ग्राहकांना EV खरेदी करण्यापूर्वी या वाहनांचा अनुभव घेता व त्यांना समजून घेता यावे.
या स्टोअरच्या उद्घाटनाविषयी बोलताना मडगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री श्री. दिगंबर कामत म्हणाले, “भारताने इलेक्ट्रिक वाहनांच्या युगामध्ये प्रवेश केल्याला आता बऱ्यापैकी काळ लोटला आहे. सुरुवातीला या वाहनांविषयी अढी बाळगणारे ग्राहक आता या नव्या वास्तवाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा खुलेपणाने स्वीकार करू लागले आहेत. त्यामुळे देशातील विद्युत वाहनांच्या विक्रीच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. या नव्या BLive मल्टि-ब्रॅण्ड स्टोअरचे उद्घाटन म्हणजे देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याप्रती आणि एका शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेची गर्वाने केलेली घोषणा आहे. गोव्यातील साक्षरतेचे उच्च प्रमाण, लोकसंख्येतील विविधता आणि देशाची पर्यटन राजधानी बनण्याच्या दिशेने हळूहळू सुरू असलेली वाटचाल यांमुळे वाहतुकीचे पर्यायी साधन म्हणून EV चा स्वीकार करण्यामध्ये ग्राहकांचा रस वाढविण्याच्या दृष्टीने हे आदर्श ठिकाण आहे.”
संदीप मुखर्जी पुढे म्हणाले, “या स्टोअरचे गोव्यामध्ये उद्घाटन करण्यासाठी श्री. दिगंबर कामत यांचा पाठिंबा मिळणे हे आमचे भाग्य आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरू केलेले गोवा इलेक्ट्रिसिटी मोबिलिटी प्रमोशन धोरण, वाहतुकीचे साधन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देते. EV ची लोकप्रियता हळूहळू वाढत असली तरीही ग्राहकांना या वाहनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने त्याबद्दल काहीशी साशंकता आहे. ग्राहकांना परिपूर्ण ‘टच अँड ट्राय’ अनुभव देऊ करत आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे वळण्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकाकुशंका दूर करत ही दरी भरून काढणे हे आमचे लक्ष्य आहे. नव्याने सुरू होणाऱ्या आमच्या प्रत्येक स्टोअरनिशी आम्ही भारताच्या घराघरात EV पोहोचवण्याच्या आपल्या मोहिमेच्या पूर्ततेच्या अधिकाधिक जवळ जात आहोत.”
शाश्वत राष्ट्राची संकल्पना साकार करण्याचा निर्धार करत BLiveने मडगावमधील नव्या स्टोअरसह देशभरात २० EV स्टोअर्स उघडली असून देशभरात शाश्वत परिवहन सहज उपलब्ध करून देणे हे या ब्रॅण्डचे लक्ष्य आहे.