गोवा खबर:मुंबई शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यात सामील होण्यासाठी गोव्याहून शिवसैनिक जाणार असून आज पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याच नियोजन करण्यात आल.
पणजी येथील शिवसेना गोवा मध्यवर्ती कार्यालयातील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात गोवा राज्य कार्यकारिणी बैठक झाली. त्यात दरवर्षी प्रमाणे उत्तर उप जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेझकर गोव्यातील शिवसैनीकां सोबत दसरा मेळाव्याला हजेरी लावणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दक्षिण उप जिल्हाप्रमुख राजाराम पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना शिंदे गटावर सडाडून टीका केली. गोव्यातील बहुसंख्य पदाधिकारी एकसंध असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मुळ शिवसेनेशी प्रामाणिक आहेत आणि तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र गोवा राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी मुंबईत पाठवणार असल्याचे ठरवण्यात आले. उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हणजुणे-कळंगुट शाखेचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
उपराज्यप्रमुख सुभाष केरकर यांनी पक्षाच्या पुढिल वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो यांनी सुत्रसंचलन केले आणि शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर यांनी आभार मानले.उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, दक्षिण जिल्हा प्रमुख एलेक्सी फर्नांडिस, बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, तिसवाडी तालुका प्रमुख महेश पेडणेकर, सत्तरी तालुका प्रमुख गुरूदास गावकर, सासष्टी तालुका प्रमुख सुर्यकांत प्रियोळकर, समाज माध्यम प्रमुख प्रतिक शिरोडकर, उत्तर जिल्हा सचिव मेहबूब मेलबान, राज्य सचिव वंदना चव्हाण, वाळपई मतदारसंघ प्रमुख देविदास गावकर, राज्य सचिव मनोज सावंत, मये मतदारसंघ प्रमुख संजय साळगावकर, उप जिल्हा प्रमुख सुनील सांतिनेझकर, मुरगाव उप जिल्हा प्रमुख राजाराम पाटील, फोंडा तालुका प्रमुख अखिल नाईक हजर होते. र्यालयातील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात गोवा राज्य कार्यकारिणी बैठक झाली.
मुंबई शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यात सामील होण्यासाठी गोव्याहून शिवसैनिक जाणार आहेत. दर वर्षी प्रमाणे उत्तर उप जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेझकर शिवसैनिकांसोबत दसरा मेळाव्यात जाणार आहेत. दक्षिण उप जिल्हाप्रमुख राजाराम पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना शिंदे गटावर सडाडून टीका केली. गोव्यातील बहुसंख्य पदाधिकारी एकसंध असून नेतृत्वाखालील मुळ शिवसेनेशी प्रामाणिक आहेत आणि तशा आयेशाचे प्रतिज्ञापत्र गोवा राज्य कार्यकारिणी पदाधिकारी मुंबईत पाठवणार आहे.