गोवा खबर: राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई गोवा संपूर्ण यात्रा चा भाग म्हणून १० ऑक्टोबर २०२२२ रोजी तिसवाडी तालुक्यातील सांत आंद्रे आणि ताळगाव मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.
ते सकाळी भाटी पंचायत सभागृहाला भेट देतील आणि सांत आंद्रे मतदारसंघातील कुडका-बांबोळी, भाटी, गोवा वेल्हा, सेंट लॉरेन्स, अझोशी-मंडूर, नेवरा, सिरदोण-पाळी या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांशी संवाद साधतील. ते पिलार सेमिनरी म्युझियम, फादर आग्नेल चर्च, पिलार आणि सेंट आंद्रे चर्च, सांतान कुडका आणि बांबोळीलाही भेट देतील.
दुपारच्या सत्रात राज्यपाल ताळगाव पंचायतीच्या सभागृहाला भेट देतील आणि ताळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांशी संवाद साधतील.
ते दोन्ही ठिकाणी डायलिसिस, कर्करोग रूग्णांना आर्थिक सहाय्य देतील.