गोवा खबर

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी, रीव्होलूशनरी गोवन्स कडून उमेदवार जाहीर

Published

on

Spread the love
 गोवा खबर:विधानसभेत खाते खोललेल्या रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातर्फे राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत.
राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर येत्या १६ तारखेला जिल्हा परिषद पोटनिवडणूकासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे ही निवडणुक मोठी रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे.
रीव्होलूशनरी गोवन्स पक्षातर्फे  सोमवारी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत,पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
राज्यात दवर्ली, कुठ्ठाळी, रेईश मागुस ह्या तीन जागांवर जिल्हा परिषद पोट निवडणुका होणार आहे. दवर्लीतून अँड्र्यू रीबेलो, कुठ्ठाळीतून लेस्ली गामा, तर रेइश मागुसमधून साईनाथ कोरगावकर यांची नावे मनोज परब यांनी जाहीर केली.
 परब म्हणाले , आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी गोव्यातील जनतेचा वेळोवेळी विश्वासघात केलेला आहे. आपल्या स्वताच्या स्वार्थापोटी मतदारांच्या विरुद्ध जावून पक्षांतर केले गेले. विकास करण्याचे कारणे सांगून प्रत्येक वेळी जनतेला फसवले गेले. आणि याचेच गंभीर परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागले.
आता जनतेकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे रेव्होलूशनरी गोवंन्स पक्ष जो सदैव गोवेकरा बरोबर असेल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल.
या पत्रकार परिषदेत सांतआंद्रे चे आमदार विरेश बोरकर उपस्थित होते. ते म्हणाले की प्रत्येक गोवेकरानी आता जागृत होणे गरजेचे आहे. कोण गोव्यासाठी, गोवेकरासाठी आवाज उठवत आहे. कोण गोवेकारांच्या अस्तित्वासाठी लढा देत आहे ते विचार करूनच निवडणुकीमध्ये मतदान केले गेले पाहिजे.
आज आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांना जनतेने कौल देऊन प्रचंड मतांनी निवडून आणावे. जिल्हा परिषद सभासद म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचा निधी हा योग्य रीतीने योग्य कामासाठी, जनतेसाठी वापरला जातील. मतदारांनी यापुढे इतर पक्षांच्या आश्वासनाला बळी न पडता, फक्त रेव्होलूशनरी गोवंन्स पक्षाच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, आणि सर्वांगीण विकास घडविण्यात हातभार लावावा असे आवाहन बोरकर यांनी यावेळी केले.

Trending

Exit mobile version