देश खबर

नवरात्रीत ‘पीएफआय’सह नऊ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा ; हिंदु जनजागृती समितीचे केंद्र सरकारकडे मागणी

Published

on

Spread the love
‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह !

 

गोवा खबर:केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातलीया निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्येतसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहेहिंदु जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलनेनिवेदनेसोशल मिडीया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होतीदेशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहेआता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावाअशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने डॉझाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालत त्याला फरार आतंकवादी घोषित केले होतेमात्र याच आतंकवाद्याची ट्वीटर आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवर ५० हून अधिक खाती चालूच आहेतयाचप्रकारे आता ‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संस्था यांवर जरी बंदी आणली असलीतरी त्यांचीही ट्वीटर आणि फेसबुक खाती अजूनही चालू आहेतया बंदीमुळे आतंकवादी कारवाया नक्कीच थांबतीलमात्र आतंकवादी विचारसरणी पसरवण्याचे कार्य चालूच राहिलजर यांचा सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार चालू राहिलातर देशात अराजक माजवण्यासाठी त्याचा वापर होईल आणि प्रत्यक्ष घातलेल्या या बंदीला काही अर्थ रहाणार नाहीत्यामुळे ‘पी.एफ्.आय.’ आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटनांची ट्वीटर आणि फेसबुकतसेच अन्य सोशल मिडीया अकाऊंटही तत्काळ बंद केली पाहिजेतअशी आमची आग्रही मागणी आहे.

पुण्यात नुकतेच ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेत्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्याअसे प्रकारही आता मोठ्या प्रमाणात होतीलतरी अशा घोषणा देणार्‍यांवरही देशद्रोहाचे खटले दाखल करावेतअशीही समितीने मागणी केली आहे

Trending

Exit mobile version