गोवा खबर

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा सरकार आणि से ओल्ड गोवा ग्रामपंचायत २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८  वाजता जुने गोवा येथील गांधी चौक येथे गांधी जयंती साजरी करणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी प्रमुख पाहुणे असतील व राज्याच्यावतीने ते महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करतील.

भारताचे पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री. श्रीपाद वाय. नाईक,  कुंभारजुवाचे आमदार  श्री राजेश फळदेसाई, से ओल्ड गोवा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. सँड्रा गोन्साल्विस या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार आहेत.

Trending

Exit mobile version