गोवा खबर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोरसे -पेडणे येथे ट्रक कार यांच्यात समोरा समोर झालेल्या जोरदार धडकेत पुण्यामधील एका महिलेसह दीड वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.रस्त्यावर योग्य दिशा दर्शक सूचना नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानीकांनी केला आहे.
अपघातग्रस्त कार मधील कुटुंब पुण्यातून गोव्यात येत असताना आज दुपारी हा अपघात झाला.
पुण्यातून कारने गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला तोरसे -पेडणे येथे भीषण अपघात झाला. गोव्यातून मासे घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.
पुण्यातून पर्यटकांची कार गोव्याकडे येत होती. तोरसे पेडणे येथे या कार आणि मासळीवाहू ट्रक मध्ये जोरदार धडक झाली.या अपघातात पुण्याच्या गुंदेजा परिवारातील एका महिलेसह चिमुकल्यालाही आपला जीव गमावावा लागला आहे.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य दोघांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला. तसेच ट्रकच्या दर्शनी भागाचही अपघातात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. मात्र दिशादर्शक आणि सूचना फलकांच्या अभावामुळे वारंवार या भागात अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धोकादायक जंक्शनवर पोलीस तैनात करून मार्गदर्शक फलकही तातडीने लावण्याची मागणी स्थानिकां कडून केली जात आहे.