गोवा खबर:उत्तर गोव्यातील १२-रेईस मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या १६ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणूकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यानी रेईस मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, गल्ली, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी अस्त्रे. बंदुका, तलवारी जवळ बाळगण्यास पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंदी लागू केली आहे.
रेईस मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघातील परवानाधारक शस्त्र मालकांनी आपली शस्त्रे, बंदुका आपल्या जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनवर २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत जमा करण्याचा आदेश दिला आहे. जमा केलेली शस्त्रे मतमोजणींच्या पाच दिवसांनंतर म्हणजे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत केली जातील.