गोवा खबर

अभाविपला मोठे यश; पीईएस मध्ये संपूर्ण पॅनल विजयी

Published

on

Spread the love

 गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवाने फोंडा एज्युकेशन सोसायटी कॉलेज (पीईएस), फोंडा येथील छात्र संघ निवडणुकीत बाजी मारली.
निवडणूकीत जीएस पदी – अनिल भिंगी, सांस्कृतिक सचिव – कुलदीप घोरपडे, जिमखाना प्रतिनिधी – अनंत सावंत, महिला प्रतिनिधी – ज्योती कुंभार यांनी मोठे विजय प्राप्त केले.
महाविद्यालयाचे नविन जीएस अनिल भिंगीने सांगितले, “अभाविपचे पॅनल विद्यार्थी समुदाय आणि पीईएस महाविद्यालयाच्या कल्याणासाठी काम करण्यास वचनबद्ध आहे.” अभाविप दक्षिण गोवा संयोजक शिवम नाईक म्हणाले, “विद्यार्थी परिषदेने सतत विद्यार्थ्यांच्या सोबत ऊभे राहून त्यांच्या समस्या समजून सोडविल्या आहेत. आजच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचाही आमच्या सोबत तेवढ्यात शक्तिने पाठिंबा आहे हे दिसून येते.” यावेळी दक्षिण गोवा महाविद्यालय प्रमुख रवींद्र गुरव व इतर कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्यांचे अभिनंदन केले.

Trending

Exit mobile version