गोवा खबर:गेल्या काही वर्षापासून गोव्यातील किमान १०५ किनारपट्टीवर गस्त घालणारे दृष्टी जीवरक्षक दल पाण्यावर आधारित बचाव आणि वैधकिय हस्तक्षेप आवश्यकता असलेल्या घटनांना प्रथम प्रतिसाद देणाऱ्या ह्या संस्थेद्वारे अजून एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तर दोन दिवसांच्या कालावधीत जीवरक्षकांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम सागरी जीव आणि शवाच्या बचाव प्रक्रिवर आधारित होता. समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या किंवा अडकलेल्या सागरी प्रजातींशी सामना करण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रथम पद्धतींमध्ये शिक्षित होण्यासोबत, विविध प्रकारच्या सागरी प्राण्यांची ओळख तसेच त्यांच्या हालचालींचे नमुने हा ह्या कार्यक्रमातील प्रशिक्षणाचा एक भाग होता.
ह्या प्रशिक्षणात प्राणी जिवंत आहे की नाही आणि त्याला उपचारांची गरज आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी जीवरक्षकांना कोड नियुक्त करण्याचे पण प्रशिक्षण देण्यात आले. मृतावस्थेत असेल तर ते कुजण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे तपासण्यासाठी त्यांना शवाचे फोटो काढण्याचे आणि मापन करण्याचे प्रशिक्षण ह्या कार्यक्रमात होते जे सागरी प्राण्यांची प्रजाती, वय आणि लिंग ओळखण्यास मदत करू शकते.
भारतीय महासागरात हम्पबॅक डॉल्फिन आणि पोर्पोईस या निवासी प्रजातींसह गोव्याच्या किनाऱ्यावरून समुद्री वन्यजीवांच्या विविध प्रजाती आढळून आल्या आहेत. गोव्याच्या किनारपट्टीवरील ऑल्हीव रेडले, हॉकाबिल् आणि ग्रीन टर्टल या कासवांच्या प्रजाती आपल्याला आढळून आल्या आहेत जे सहसा कूपन किंवा जाळ्यात असलेले असतात तसे विविध प्रजातींचे पक्षी पण आढळतात.
प्राणी जिवंत असल्यास जीवनरक्षकांनी अनुसरण्यासाठी टिपा
*गर्दी टाळण्यासाठी परिसर बंद करा, सुरक्षेसाठी स्थळावर उपस्थित असलेल्या लोकांना प्रण्याकडून २५ मीटरच्या अंतरावर ठेवा.
प्राण्याचे नाक वाळू किंवा पाण्याने झाकलेले नाही याची खात्री करा
प्राण्याला उलटून आराम करायला देऊ नक
पुढील पशुवैद्यकीय देखरेखीखाली राज्य वन विभागाला अडकलेल्या प्रकरणाचा अहवाल द्या.
प्राण्यांची त्वचा ओली असल्याची खात्री करा
प्राण्याला उन्हापासून वाचवण्यासाठी तात्पुरती रचना करा
*गोफणीच्या सहाय्याने जनावराला त्याच्या खालच्या बाजूने आधार देऊन पाण्याच्या दिशेने हलवा. गोफण कापड, टॉवेल, ब्लँकेट किंवा तारापॉलिनपासून बनवलेले असू शकते आणि जास्तीत जास्त समर्थन सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांनी धरले पाहिजे. जेव्हा प्राणी स्वतःला तरंगत ठेवण्यास आणि पोहण्यास सक्षम असेल तेव्हाच गोफण सोडा (पशुवैद्यांच्या मार्गदर्शनानुसार सोडण्याच्या बाबतीत)
प्राणी मेला असेल तर जीवनरक्षकांनी पाळल्या जाणाऱ्या टीपा
*लोकांना मृत प्राण्यापासून दूर ठेवण्याची खात्री करा कारण त्या प्राण्यापासून काही संसर्ग रोग पण होऊ शकतात
*प्राण्यांचे डोके, जबडा, पृष्ठीय पंख आणि गुप्तांगांचा फोटो काढून ठेवा.
*अडकलेल्या ठिकाणाची माहिती, पाहण्याची वेळ आणि शव दिसल्यावर त्याची स्थिती याविषयी माहिती नोंदवा.
*शवाला स्पर्श न करता शक्य तितक्या शव मोजमापांवर फॉर्म भरा
*कोणत्याही दुखापतीच्या खुणा आणि जखमा फोटो काढा आणि टिपा
*प्राणी पुन्हा कोंडल्यास त्याचे निरीक्षण करा.
*पशुवैद्य आणि संशोधकांना प्रदान करण्यासाठी डेटा गोळा करा
*शवाला स्पर्श न करता शक्य तितके शवाचे मोजमाप घ्या.