गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहीद राजाभाऊंना मरणोत्तर सन्मानपत्र प्रदान

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी ‘महालक्ष्मी’, आल्तिन्हो पणजी येथे गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्ती, शौर्य आणि पराक्रमाबद्दल हुतात्मा राजाभाऊ उर्फ नारायण महांकाळ यांची नात श्रीमती आदिती अंतेकर यांना सन्मानपत्र प्रदान केले.

२६ जानेवारी १९२३ रोजी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे जन्मलेले हुतात्मा राजाभाऊ उर्फ नारायण महांकाळ हे कॉम्रेड चितळे आणि वसंतराव ओक यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या गटात सामील झाले. त्यांनी बांदा मार्गे गोव्यात प्रवेश केला आणि १५ ऑगस्ट १९५५ रोजी पत्रादेवी येथे सत्याग्रह केला. पोर्तुगीज पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना सहोदरा देवी राय यांच्यासमवेत रुग्णवाहिकेतून सेंट ल्यूक्स हॉस्पिटल, वेंगुर्ला येथे नेण्यात आले जेथे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.

शहीद राजाभाऊ उर्फ नारायण महांकाळ यांच्या नातवाशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यदिनाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गोवा सरकारने गोवा आणि भारताच्या इतर भागातील ७५ शहीद जवानांच्या ज्यांनी गोवा मुक्त करण्यासाठी सत्याग्रहात भाग घेतला होता  त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Trending

Exit mobile version