गोवा खबर

राज्यपालांकडून कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांचे  अभिनंदन

Published

on

Spread the love

 गोवा खबर:राज्यपाल  श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पणजी आल्तिनो येथील आर्चबिशप हाउस येथे भेट घेतली.

यावेळी कार्डिनलचे सचिव फादर जोकिम लोयोला परेरा, कुलपती  आर्चबिशप हाऊस  फादर रोमियो मॉन्तेरो आणि सहाय्यक प्रोक्युरेटर  फादर मारियो सौझा उपस्थित होते .

कार्डिनल्सच्या निर्मितीसाठी आयोजित समारंभात प्रतिष्ठित फिलिप नेरी फेर्राव यांना रोममधील कार्डिनल्स कॉलेजमध्ये गेल्या महिन्यात समाविष्ट करण्यात आले होते.

Trending

Exit mobile version