गोवा खबर

‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू देवतांची टिंगल सहन करणार नाही: हिंदु जनजागृती समितीची चेतावनी

Published

on

Spread the love

 गोवा खबर: अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहेया चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब करणार्‍या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहेत्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेतअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्मातील चित्रगुप्त आणि यम देवता यांची टिंगल आम्ही कदापि सहन करणार नाहीसेन्सॉर बोर्ड हा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत झोपले होते का सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नयेअन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध करूअसा इशारा देतानाच राज्यतसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.


    या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या धार्मिक संकल्पना आणि देवता यांची टिंगल करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेतया चित्रपटातील काही दृष्ये अन् संवादच समोर आले आहेतप्रत्यक्षात पूर्ण चित्रपटात आणखी आक्षेपार्ह संवाद असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

      या चित्रपटात अजय देवगण यांना सुटबुट घातलेले मॉडर्न ‘चित्रगुप्त’ दाखवले असून यमदूतांना ‘वाय.डी.’ (YD) असे नावाचा अपभ्रंश करून संबोधले आहेहिंदु धर्म शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर चित्रगुप्त त्याच्या पापपुण्याचा हिशोब करतातअसे असतांना या संकल्पनेची मोडतोड करून सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याचा मृत्यू झालेला नसतांना त्याला चित्रगुप्ताच्या दरबारात नेलेले दाखवले आहेतेथे चित्रगुप्त त्याच्याशी ‘गेम ऑफ लाईफ’ खेळताना दाखवले आहेएकूणच हिंदु धर्मांतील एका उदात्त संकल्पनेला ‘कॉमेडी’च्या नावाखाली चुकीच्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने दाखवून त्याची टिंगल करण्यात आली आहे.



यापूर्वीही ‘पीके’, ‘ओ माय गॉड’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘तांडव’ यांसारख्या अनेक चित्रपट अन् वेब सिरीज यांमधून हिंदु धर्मदेवतासाधूसंत यांना लक्ष्य केले गेलेहिंदूंच्या प्रथापरंपरांविषयी विनोद करून त्यांविषयी घृणा निर्माण केली जातेहे सर्व रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहेतसेच सेन्सॉर बोर्डामध्येही धार्मिक प्रतिनिधी असायला हवेतजे धार्मिक भावनांचा अनादर होऊ नयेयाची काळजी घेतीलअशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.  

Trending

Exit mobile version