गोवा खबर

सामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करा: पुरुषोत्तम सोमानी

Published

on

Spread the love
‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे विशेष संवाद !
 

गोवा खबर:औषधांचे अधिकतम मूल्य (एम.आर्.पी.) जास्त असावेयासाठी घाऊक औषध विक्रेतेकिरकोळ औषध विक्रेते यांचा औषधनिर्मिती आणि विक्री करणार्‍या फार्मा कंपन्यांवर मोठा दवाब आहेतसेच रूग्णालयेडॉक्टर्स आदींचाही या साखळीत असणारा सहभाग आणि ‘एम्.आर्.पी.’ यांवर केंद्र शासनाचे कुठलेही नियंत्रण नाहीत्यामुळे औषधे मनमानी पद्धतीने चढ्या दरांत ग्राहकांना विकली जात आहेतलोकसुद्धा ‘एम्.आर्.पी.’वर केंद्र शासनाचे नियंत्रण आहेअशा भ्रमात राहून औषधे खरेदी करत आहेतजसे कर्करोगावरील औषधांवर 30 टक्क्यांचा ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावला आहेम्हणजे 100 रुपयांचे औषध हे अधिकतम 130 रुपयांना विकू शकतोमात्र अशी औषधे खूप चढ्या दरात विकली जात आहेतसामान्य जनतेची होणारी ही लूट थांबवण्यासाठी केंद्र शासनाने सर्व प्रकारची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांवर ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करावायामुळे औषधे 80 ते 90% ने स्वस्त मिळतीलअशी मागणी तेलंगाना येथील उद्योगपती आणि ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्रीपुरुषोत्तम सोमानी यांनी केली आहे.

 ते हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या वतीने आयोजित ‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या ‘विशेष संवादा’मध्ये बोलत होतेया कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्रीनरेंद्र सुर्वे यांनी श्रीसोमानी यांच्याशी संवाद साधला.

      ‘लोकांना स्वस्त आणि चांगली औषधे मिळवण्यासाठी काय करावे’याविषयी श्रीसोमानी म्हणाले, ‘बहुतांश जनतेला हे माहिती नसते कीबाजारातील अनेक औषधे ही जेनरीक आहेतमात्र अनेक प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापने ती औषधे स्वत:चे नाव (ब्रॅण्डलावून अधिक दराने विकतातही ब्रॅण्डेड औषधे अधिक दरात विकली जातातज्यामध्ये दुकानदार जेमतेम ते 10% सवलत देतोजेनरीक औषधे ब्रॅण्डेड औषधांप्रमाणेच उच्च दर्जाची असतातमात्र लोकांचा डॉक्टरांवर अतिविश्वास असल्याने लोक डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेतातजेनरीक औषधांवर सवलत सुद्धा अधिक प्रमाणात मिळतेआता सर्वत्र ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकाने’ आहेतया दुकानांत ‘एम्.आर्.पी.’ स्वस्त दरात ठेऊन औषधे मिळतातलोकांनी ही महाग ब्रॅण्डेड औषधे खरेदी करण्याऐवजी ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकानांतून औषधे खरेदी करावीत किंवा जेनरीक औषधे खरेदी करावीत.’ ते पुढे म्हणाले कीआपल्या देशात लोकांमध्ये जागरूकता नसल्याने फार्मा कंपन्या समाजाची दिशाभूल करत आहेतपरिणामी सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहेतसेच केंद्र शासनाचेही 5.50 लक्ष करोडचे नुकसान होत आहेयातून काळया पैशांची निर्मिती होत आहेयाविषयी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहेअधिक दरात विकल्या जाणार्‍या औषधांच्या लुटमारीविषयी आम्ही गेली काही वर्ष लढा देत आहोतमात्र आता जनतेने आणि विविध संघटनांनीही जिल्हाधिकारीतहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन शासनावर दबाव टाकण्याची आवश्यकता असल्याचे ही श्रीसोमानी यांनी म्हटले आहे.

Trending

Exit mobile version