गोवा खबर

शिरोडकर यांची स्नेह मंदिराला भेट

Published

on

Spread the love

 गोवा खबर:प्रोव्हेदोरिया मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी फोंडा येथील स्नेह मंदिरास भेट दिली.

स्नेह मंदिराला भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना श्री शिरोडकर यांनी  हे ठिकाण माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असून या ठिकाणी भेट देऊन खूप आनंद होतो असे सांगितले. स्नेह मंदिराच्या माध्यमातून गोवा हिंदू असोसिएशनाच्यावतीने वृद्ध लोकांसाठी करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचे आणि मानवतेच्या सेवेचे त्यांनी कौतुक केले. स्नेह मंदिराने दिलेल्या सेवेबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विष्णू एम कवळेकर स्कूल ऑफ होम नर्सिंगच्या पहिल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कारही केला.

यावेळी होम नर्सिंग स्कूलचे प्राचार्य राजेंद्र तालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 श्रीधर कामत बांबोळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Trending

Exit mobile version