गोवा खबर

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा:प्रबल प्रतापसिंह जुदेव

Published

on

Spread the love
हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’
 

           

गोवा खबर:ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळारुग्णालये अवश्य उघडावीतमात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहेआपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहेत्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहेधर्मांतर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहेजिथे जिथे हिंदूंचे धर्मांतर झालेतो भाग अस्थिर झालायाला इतिहास साक्षी आहेआज देशातील अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा लागू केला असलातरी हा कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहेयासाठी देशभरातील हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे आवाहन भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री आणि अखिल भारतीय घरवापसी प्रमुख श्रीप्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केलेते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

            विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीविनोद बन्सल म्हणाले की, ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ याविषयी कुठलीही शंका असता कामा नयेअखंड भारतापासून अफगाणिस्तानपाकिस्तानबांगलादेश हे धर्माच्या आधारावरच वेगळे झालेजिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या घटलीतिथे हिंदू बाटला गेलाकाश्मीरबंगालकेरळईशान्य भारतातील राज्ये ही याची उदाहरणे असून तिथे आतंकवादी कारवायाजिहादी आक्रमणांत वाढ झाली आणि तेथील हिंदू अल्पसंख्य झालेधर्मांतर रोखण्यासाठी अनेक साधूसंतांनी बलीदान दिले आहेओडिशा येथील स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी धर्मांतर रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या घरवापसीसाठी महान कार्य करत आपल्या प्राणांचे बलीदान दिलेधर्मांतर थांबवणे खूप आवश्यक आहे.’

            हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राज्यस्थान समन्वयक श्रीआनंद जाखोटिया म्हणाले की, ‘जेव्हा एका व्यक्तीचे धर्मपरिवर्तन होतेतेव्हा फक्त त्याचे धर्मपरिवर्तन होत नसून आपल्या धर्माच्या विरोधात एक शत्रू म्हणून तो उभा राहतो’असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होतेपूर्वी अखंड असलेला भारत आता विभागला गेला आहेदेशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेतधर्मांतराच्या समस्येने आता व्यापक रूप धारण केले आहेहिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहेदेशभर धर्मांतरविरोधी कायदा अशा कठोर पद्धतीने लागू करायला हवा कीधर्मांतर करण्याची कोणाची हिंमत होणार नाहीधर्मांतरविरोधी कायदा ही काळाची आवश्यकता आहे.’

Trending

Exit mobile version