गोवा खबर:गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये धावपट्टीवर जात असतानाच बिघाड झाल्याचे लक्षात येताच नौदलाच्या बचाव पथकाच्या मदतीने विमानातील 187 प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमानतळ संचालकांनी घटनेची माहिती दिली.
6E6097 हे विमान गोव्याहून मुंबईकडे निघाले होते.विमान धावपट्टीवर असतानाच इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा देण्यात आला. यानंतर अलर्ट जारी करण्यात आला. नौदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून 187 प्रवाशांची सुखरूप सुटका केली.ज्यात 4 बालकांचा देखील समावेश होता. नौदलाच्या पथकाने हे विमान दुसऱ्या टॅक्सी बे वर हलवले आहे.
या विमानात 187 प्रवासी होते.या घटनेमुळे विमानतळावरील अन्य विमानाच्या उड्डाणावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले..