गोवा खबर

भाजपा सरकारचा 100 टक्के हर घर जलचा दावा धादांत खोटा:आप

Published

on

Spread the love
 गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ‘हर घर जल’ योजना प्रमाणपत्र मिळवणारे गोवा हे पहिले राज्य ठरल्याचा दावा धादांत खोटा असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
आजही राज्यातील अनेकांना विविध कारणास्तव नळजोडणीचा फायदा घेणे अशक्य झाले आहे. प्रत्येक घरात नळजोडणीच शक्य झाले नाही तर ‘हर घर जल’ प्रमाणपत्राचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील जनतेला फसव्या घोषणा करून मूर्ख बनवण्याचे थांबवावे, असे पालेकर म्हणाले.
राज्यात अशी अनेक गावे आणि वसाहती आहेत जिथे पाण्याचे पाईप कनेक्शन नाही आणि जेथे पाईप टाकले आहेत तेथे पाणीपुरवठा होत नाही. गोव्यात दर आठवड्याला कुठे ना कुठे पाणीपुरवठ्याअभावी संतापलेल्या नागरिकांकडून आंदोलन केले जाते. असे पोकळ दावे करून भाजप जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सावंत यांनी गेल्या वर्षी गोवा 100% हागणदारी मुक्त झाल्याचा दावा केला होता. ‘हर घर जल’ दावा हागणदारी मुक्त गोवापेक्षाही धादांत खोटा आहे, अशी टीका पालेकर यांनी केली.
केंद्र सरकारच्या “हर घर जल” या संकेस्थळवरच्या माहितीवरून असे दिसून येते की कालच्या घोषणेमध्ये 2.63 लाख कुटुंबांना पाईपद्वारे पाणी पुरवल्याचा दावा सप्टेंबर 2020 मध्ये आधीच केला गेला होता. “मोदी सरकारच्या संकेतस्थळनुसार, सप्टेंबर 2020 पासून गोव्यातील एककाही घराला पाण्याचे पाईप जोडले गेले नाही, मग ही अचानक घोषणा कशासाठी आहे? सरकारने प्रत्यक्षरित्या केलेल्या कामाच्याबाबतीत दाखवण्यासारखे काहीच नसल्यामुळे भाजप सरकार एक “इव्हेंट मॅनेजमेंट सरकार” बनले आहे, असे पालेकर म्हणाले.
पालेकर पुढे म्हणाले, “आपल्या अक्षमतेची लाज बाळगण्याऐवजी, सरकार बनावट उत्सव, फलक आणि प्रसिद्धी यासाठी करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. हा सगळा अपप्रचार आहे”.
राज्यात आज अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे पाण्यासाठी गावकरी पायपीट करत आहेत. आम आदमी पार्टी या ठिकाणांचे दस्तऐवजीकरण करत असून लवकरच भाजप सरकारचे खोटे दावे उघड करेल. अशी ठिकाणे पाहण्यासाठी पालेकर यांनी सावंत यांना राज्यातील कोणत्याही तालुक्यात पालेकर यांच्यासोबत शॉर्ट ड्राईव्हमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version