गोवा खबर

गोव्याच्या राज्यपालांनी स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान न केल्याबद्दल गोवा टीएमसीकडून निषेध

Published

on

Spread the love
गोवा खबर:भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि योगदान ओळखण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोवा तृणमूल काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांचा निषेध केला आहे. 
राज्यपालांच्या चुकीवर प्रकाश टाकताना, टीएमसी नेते समील वळवईकर म्हणाले, ‘आम्ही आमचा ७५वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत, परंतु आमच्या राज्यपालांनी आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रित केले नाही हे पाहून धक्का बसला. आमच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अपमानाची त्यांनी दखल घ्यावी  आणि ही चूक सुधारावी .’
त्याच विषयावर बोलताना गोव्याचे टीएमसी नेते मारियानो रॉड्रिग्स म्हणाले, ‘आम्ही अशा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणाचा तीव्र निषेध करतो. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ब्रिटीश राजवटीतून देश मुक्त होण्याची खात्री देणाऱ्या निडर आणि धाडसी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्यापेक्षा कमी नाही.’’
गोवा टीएमसीने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आदरणीय स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सत्कार/ सन्मान करण्याची मागणी केली आहे.

Trending

Exit mobile version