गोवा खबर

“शिर्डीच्या साईबाबा” भक्तीगीत 11 ऑगस्ट रोजी लोकार्पण होणार

Published

on

Spread the love
गोवा खबर:समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई 11 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या सचिवालयाच्या चेंबरमध्ये जॉन आगियार  निर्मित नवीन व्हिडिओ भक्तिगीत “शिर्डीचे साईबाबा” लोकार्पण करतील.
या गाण्याचे बोल  कवी आणि गीतकार  आगियार यांनी लिहिले असून  हे गाणे प्रसिद्ध संगीतकार  मुकेश घाटवळ यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे.
दीपांजली प्रकाशनाने सादर केलेला व्हिडिओ  मुकेश घाटवळ यांनी सहनिर्मिती केली आहे.
कलाकार/कास्ट: साईबाबाची भुमीका:  जॉन आगियार. सतारवादक: सशा हरमलकर, तबला: हर्षा पै, कीतार: मुकेश घाटवळ, डीओपी/सिनेमॅटोग्राफी ड्रोन: आय क्लिकचे उद्धव केरकर, संगीत, प्रोग्रामिंग, रेकॉर्डिंग आणि मिश्रण  मुकेश घाटवळ यांचे आहै. स्थळ: भुतखांब पठार, केरी. या व्हिडिओला  पंकज नाडकर्णी यांनी पाठिंबा दिला आहे.

Trending

Exit mobile version