गोवा खबर

आप ला गोव्यात राज्य पक्ष म्हणून मिळाली अधिकृत मान्यता

Published

on

Spread the love
गोवा खबर:आप गोवा डेस्क-प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी आज माहिती दिली, की गोवा राज्यातील आम आदमी पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता देणारी अधिकृत अधिसूचना, भारतीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे.
ह्या यशाबद्दल स्थानिक नेते आणि स्वयंसेवकांचे अभिनंदन करताना, अतिशी म्हणाल्या,  की गोवा युनिट २०१२ मध्ये गोव्यात स्थापना झाल्यापासून सक्रियपणे कार्यरत आहे.
“अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दल, आम्ही गोव्यातील लोकांचे आभारी आहोत.  गोव्याची अस्मिता, संस्कृती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी लोकांनी आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत राहू”, असेही आतिशी यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी या सूचनेचे स्वागत केले आहे. या सुचनेतून गोव्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
“दिल्ली आणि पंजाबमधील लोक सुशासनाचा आनंद घेत असल्याचे गोमंतकीयांनी पाहिले आहे.  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आमचे दोन आमदार, वेळळीचे इंजि. क्रुझ सिल्वा आणि बाणावलीचे कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास देखील चमकले.  गोव्यात पुढचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी गोव्यातील जनता आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमताने देईल, यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू,” असे पालेकर म्हणाले.
ही बाब लक्षात घ्यावी लागेल, की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडी (यु) आणि एचडी देवे गौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी (एस) व्यतिरिक्त, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप हा, तीन राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखला जाणारा देशातील तिसरा राजकीय पक्ष ठरला आहे.

Trending

Exit mobile version