गोवा खबर

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभात होणार स्वातंत्र्य सैनिकांचा मरणोत्तर सत्कार

Published

on

Spread the love

 गोवा खबर:सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.१५ वाजता पणजीतील जुने सचिवालयासमोर राज्यस्तरीय समारंभ आयोजित केला असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी लोकांना संबोधित करतील.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभही विविध तालुका मुख्यालयात सकाळी ९.१५  वाजता होणार आहे .  आणि पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे म्हापसा येथे; मयेचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट, डिचोली येथे, कृषी मंत्री श्री रवी नाईक फोंडा येथे; जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर काणकोण येथे, वाहतूकमंत्री श्री माविन गोदिन्हो वास्को येथे; विधिमंडळ मंत्री श्री नीलेश काब्राल मडगाव येथे, पेडणेचे आमदार श्री प्रवीण आर्लेकर पेडणे येथे;  श्रीमती. आमदार देविया राणे वाळपई येथे,  क्रीडा मंत्री श्री गोविंद गावडे, केपे येथे, आमदार श्री गणेश गावकर धारबांदोडा येथे  आणि समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, सांगे येथे ध्वजारोहण करतील.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वातंत्र्यसैनिक आणि इतर मान्यवर यांच्यासह पत्रादेवी, पेडणे येथे हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करतील.

सर्व खाते ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या अनुषंगाने १३ ऑगस्ट २०२२ ते १५  ऑगस्ट २०२२  या कालावधीत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आयोजित करतील. हे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व्यापक सहभागाने आयोजित केले जातील ज्यामध्ये धावणे, चालणे, क्रीडा स्पर्धा, ट्रेक, पथनाट्य, देशभक्तीच्या भावनेने सांस्कृतिक गायनाचे कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम असतील. वृक्षारोपण, सॅनिटायझेशन ड्राइव्ह अशामध्ये सर्व स्तरातील आणि सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

गोवा स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचाही सरकार या प्रसंगी मरणोत्तर सत्कार करणार आहे. तिसवाडी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा राज्यस्तरीय कार्यक्रमात तर इतर स्वातंत्र्यसैनिकांचा संबंधित तालुकास्तरीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे सर्व हुतात्म्यांची पुस्तिकाही याप्रसंगी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देश हर घर तिरंगा – एक राष्ट्र, एक भावना, एक अस्मिता साजरा करणार आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या घरांवर/संस्था/व्यावसायिक उपक्रमांवर झेंडे फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक शहर/गावातील विविध ठिकाणी झेंडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Trending

Exit mobile version