गोवा खबर

गतिरोधक उभारण्याचे आदेश

Published

on

Spread the love

देश खबर: उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शिवोली मार्ना येथील ग्राम पंचायत हद्दीतील गावाच्या रस्त्यावर ३ हंप टाईप गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

चोपडे, पेडणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुने पोस्ट ऑफिस शिवोलीजवळील जंक्शनपासून दूर एक हंप टाईप गतिरोधक, इलेक्ट्रिकच्या विरुद्ध असलेल्या अंजुनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांगम दुकानाजवळ जंक्शनपासून दूर एक हंप टाईप गतिरोधक उभारण्यात येईल. म्हापसा ते शिवोली बार्देशकडे जाणाऱ्या रस्त्यावर खांब क्रमांक HT 061-2,27/14/A7 आणि विद्युत खांबासमोरील जंक्शनपासून दूर उभारण्यात येणारा एक गतिरोधक क्रमांक HT/173/28 वर वाडी शिवोली, बार्देशकडे जाणारा रस्त्यावर उभारण्यात येईल.

जिल्हा दंडाधिकार्‍यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.

Trending

Exit mobile version