गोवा खबर: २०२१-२२ वर्षासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी गृह मंत्रालयाच्या (URL awards.gov.in ) द्वारे डिझाइन केलेल्या पासवर्ड संरक्षित केंद्रीयकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना राबवित आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी ३ डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने प्रदान केले जातात.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे खात्याच्या ( www.disabilityaffairs.gov.in ) या वेब पोर्टलवर तसेच ( www.awards.gov.in ) या पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहेत.