गोवा खबर

विभागिय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सव

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:युवकांना त्यांच्या सांस्कृतिक कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानुसार विभागीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येतील ज्यामध्ये ३ तालुके एकत्र करून एक झोन करण्यात येईल. स्पर्धेच्या तात्पुरत्या तारखा आणि ठिकाणांसह ४ झोन खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक विभागातील पहिले तीन विजेते राज्य स्तरासाठी पात्र ठरतील आणि राज्य युवा महोत्सवातील विजेत्यांना राष्ट्रीय युवा महोत्सव २०२२-२३  साठी नियुक्त केले जाईल.

विभाग आणि राज्यस्तरीय कार्यक्रमाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत. झोन-१ अंतर्गत, पेडणे, बार्देश आणि तिसवाडी तालुक्यांसाठी ही स्पर्धा शेतकरी सहकारी सोसायटी हॉल, पेडणे येथे संपन्न होईल. विभाग-२ अंतर्गत डिचोली, सत्तरी, धारबांदोडा तालुक्यांसाठी रवींद्र भवन, सांखळी येथे संपन्न होईल.  झोन-३ अंतर्गत सासस्टी, मुरगांव आणि फोंडा तालुक्यांसाठी रवींद्र भवन मडगांव येथे स्पर्धा होईल. झोन-४ अंतर्गत, काणकोण, केपे आणि सांगे तालुक्यांसाठी ही स्पर्धा रवींद्र भवन कुडचडे येथे संपन्न होईल. आणि राज्यस्तरीय १९ वा राज्य युवा महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे होणार आहे.

१५ ते २९ वर्षे वयोगटातील पात्र तरुणांकडून शैक्षणिक संस्था, युवा क्लब, संगीत संस्था, नोंदणीकृत युवा गट इत्यादींद्वारे अर्ज सादर केले जातील, विभागीय, राज्य युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी स्पर्धकाचे वय १ ऑगस्ट २०२२ रोजी १५ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि २९ वर्षापेक्षा जास्त नसावे.

संबंधित जन्म पुरावा आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र आणि बँक तपशील (बँक पासबुक प्रत) सह रीतसर भरलेले सर्व अर्ज क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, कांपाल, पणजी-गोवा यांच्या कार्यालयात ५  सप्टेंबर २०२२ पूर्वी  किंवा dir-spor.goa@nic.in वर ईमेलद्वारे सादर करावे.

पात्रतेसाठी संबंधित नियम आणि शर्ती अर्जाचा नमुना आणि कार्यक्रमांच्या यादीसह क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईट www.dsya.goa.gov.in वर अपलोड केले आहेत.

उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया श्रीमती मनुजा सावईकर यांच्याशी ९९२३९०७१४९ वर संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version