गोवा खबर

मानव संसाधन विकास महामंडळतर्फे वनमोहोत्सव साजरा 

Published

on

Spread the love
                                                               
गोवा खबर:गोवा मानव संसाधन विकास महामंडळतर्फे परवरी येथे आज टिळक पुण्यतिथी निमित्त वनमोहोत्सव साजरा करण्यात आला. परवरी येथील कार्यालयाच्या मागील बाजूचा परिसर औषधी वनस्पतींचे उद्यान म्हणून विकसित करण्यात आला असून त्यात अडुळसा, इन्सुलिन, पंडुती, कृष्णवास, सीताफळ, मेती आदी वनस्पतींची लागवड करण्यात आली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री नारायण नावती म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात इतरांना झाडे लावण्यासाठी प्रेरणा देण्याच्या मार्गावर फायदा होईल. परिसराची स्वच्छता आणि उद्यान म्हणून विकसित करण्याच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
एमडी श्री नावती, महाव्यवस्थापक श्री जॉन आगियार, मुख्य लेखाधिकारी श्री फिलोमोनो परेरा, ओएसडी श्री अखिल शेटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री विजय गावस, श्री नरेंद्र मयेकर, श्री गंधार आमोणकर, श्रीमती स्नेहा मोपकर, कु. नमिता चोडणकर आणि इतरांनी रोपे लावली.अखिल शेटकर यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version