गोवा खबर

 २९ जुलै रोजी नौदलाचा गोळीबार सराव

Published

on

Spread the love

गोवा खबर:२९ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत नौदलाच्या जवानासाठी मुरगाव, हेडलँड, सडा येथे गोळीबार सराव होईल. गोळीबार सरावामुळे १५ नॉटिकल मैल अंतरापर्यंत प्रवेश करणे धोक्याचे आहे. तसेच हवेत  ७,१०० मीटर उंचीपर्यंत गोळीबार सराव होईल.

त्यासाठी सर्व बार्जेस, प्रवासी लाँची, क्रुईज बोटी, जलक्रिडा बोटी, होडी, फेरीबोटीं, मच्छिमारी बोटीं, आणि इतर यांत्रिकीं व बिनयांत्रिकीं नाविकांनी गोळीबाराच्या काळांत वरील धोक्याच्या भागात प्रवेश करू नये, असे नौदल खात्याने कळविले आहे.

Trending

Exit mobile version