गोवा खबर

११ ते १७  ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य सप्ताह

Published

on

Spread the love

 गोवा खबर:आझादी का अमृत मोहत्सव (AKAM) च्या राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने (एनआयसी) ‘हर घर तिरंगा’ नावाच्या उपक्रमाला मान्यता दिली आहे. भारतीय राष्ट्रध्वज  जो संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक असून तो देशभक्ती आणि आदराची भावना निर्माण करतो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जनतेला घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या मोहिमेमुळे सर्वसामान्यांना आझादी का अमृत महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याची आणि देशासाठी अभिमान वाटण्याची संधी मिळणार आहे. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘स्वातंत्र्य सप्ताह’ दरम्यान प्रत्येक घरामध्ये ध्वज फडकवायचा आहे.

Trending

Exit mobile version