गोवा खबर

इन्क्विझिशन’च्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला देण्यासाठी लवकरच ‘गोवा फाईल्स-2:वेलिंगकर

Published

on

Spread the love

गोवा खबर:भगवान परशुराम ही देवता गोव्याचे रक्षण करतेगोव्याच्या काळ्या इतिहासातील ‘इन्क्विझिशन’ला कथित संत फ्रान्सिस झेवियर हाच कारणीभूत होतात्यामुळे गोव्यात 250 हून अधिक वर्षे ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून केलेल्या जुलमी अत्याचारांची सत्य माहिती नव्या पिढीला देणे आवश्यक आहेयासाठीच ‘गोवा फाईल्स’चा दुसरा भाग गोमंतकीयांच्या समोर ठेवणार आहेअसे प्रतिपादन गोवा येथील ‘भारत माता की जय संघा’चे राज्य संघचालक प्रासुभाष वेलिंगकर यांनी केले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकतेचा यशस्वी प्रयोग हिंदु रक्षा महाआघाडी’या विषयावर ते बोलत होतेया वेळी व्यासपिठावर स्वामी आत्मस्वरूपानंद महाराज,  परमात्माजी महाराजधारवाडकर्नाटकतसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे उपस्थित होते.  


 प्रासुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले, ‘‘गोवा येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी वाढलेली आहेगोव्यातील अनेक ठिकाणांचा ताबा मुसलमानांनी घेतला आहेगोवा येथे ‘पॉप्युलर फ्रंट इंडिया’ (PFI) ही कट्टर इस्लामिक संघटना सक्रिय झाली आहेगोव्यातील धर्मांध मुसलमान मुख्यमंत्र्यांना चेतावणी देऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस करू लागले आहेतया सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन करणे आवश्यक आहेत्यासाठी गोवा येथील लहानमोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या 350 प्रतिनिधींना घेऊन आम्ही हिंदु रक्षा महाआघाडीची स्थापना केली आहेधर्मांतराचा विरोधजिहादचा विरोधमंदिर सुरक्षाधर्मशिक्षण, हिंदु संस्कार अशी पंचसूत्री सिद्ध करून त्यानुसार कार्य करण्यात येत आहेगोवा राज्यातील सर्व संस्था स्वतःचे कार्य करत असतांना या पंचसूत्रींचा त्यांच्या कार्यप्रणालीत अंर्तभाव करण्यात आला आहे.’’   

सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! –परमात्माजी महाराजकर्नाटक

 

    धर्मावर अधर्माचे आक्रमण चालू झाले तेव्हा भगवान परशुराम यांनी परशु धारण केलाअशा भगवान परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजेही संघर्षाची वेळ आहेत्यासाठी प्रत्येक संत आणि संन्यासी यांनी हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवीत्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहेअसे आवाहन धारवाड (कर्नाटकयेथील  परमात्माजी महाराज यांनी केलेते ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक संस्थांच्या एकतेसाठी केलेले प्रयत्न’या विषयावर ते बोलत होते.

     भारत एक आध्यात्मिक भूमी आहेभारताचा इतिहास पाहिल्यास भारतामध्ये जेव्हा जेव्हा काही बदल झालातो मुख्यतः आध्यात्मिक संस्थांनीच केला आहेआपल्या देशात आध्यात्मिक संस्था आणि संत यांची संख्या मोठी आहेहे सर्व हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी एकत्र आलेतर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी वेळ लागणार नाहीअसेही पूपरमात्माजी महाराज म्हणाले.

आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! –  डॉशिवनारायण सेनबंगाल

     पूर्वीच्या काळी भारतात शाळा या मंदिरांमध्येच चालवल्या जात होत्याजवळपास प्रत्येक गावात एक मंदिर होते आणि प्रत्येक गावात एक शाळा होतीएक इंग्रज अधिकारी थॉमस मुन्रो यांच्या अहवालानुसार वर्ष 1826 मध्ये दक्षिण भारतात लाख 28 हजार शाळा होत्याज्यांत ब्राह्मणक्षत्रियवैश्य विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्के होतेतर क्षुद्र विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होतेपुढे हे सर्व इंग्रजांनी बंद केलेआजही भारतात कोणत्याही शाळेत धार्मिक शिक्षण देता येत नाहीत्यामुळे सर्व संस्थांनी एकत्रित येऊन आदर्श चरित्र निर्माण होईलअसे धार्मिक शिक्षण देणे आवश्यक आहेअसे आवाहन बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे उपसचिव  डॉशिवनारायण सेन यांनी केले.

Trending

Exit mobile version