गोवा खबर

गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी न्यायालयीन  लढ्यासाठी पुरावे देण्याचे आवाहन !

Published

on

Spread the love
विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम !
 
 

गोवा खबर:देशपातळीवर राममंदिरकाशीमथुराकुतुबमिनारताजमहल आणि भोजशाळाच नव्हेतर हजारो मंदिरे मुघलपोर्तुगिज आदी आक्रमकांनी पाडली आहेतभारत स्वतंत्र झालामात्र हिंदूंची  प्राचीन  धार्मिकस्थळे  परकीय  दास्यतेत तशीच राहिली.  त्यामुळे आक्रमकांनी  विध्वंस  केलेल्या  मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी  देशव्यापी  मोहीम  उघडण्याचा  संकल्प समस्त मंदिर संघटनाभक्तपुरोहित आणि  हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलायात गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी पुरावे मिळाल्यास त्या विषयी न्यायालयीन लढा दिला जाईलअसा निर्धार गोवा येथील दशम ‘अखिल भारतीय 

हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या द्वितीय दिनी अधिवक्त्यांकडून करण्यात आला
या लढ्यासाठी गोमंतकातील जनतेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे हिंदु जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आवाहनही श्री रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात (फोंडागोवाआयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.

या वेळी व्यासपिठावर सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैनवाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादवगोवा येथील ‘भारत माता की जय’ संघटनेचे संघचालक श्रीसुभाष वेलिंगकर, ‘गोवा मंदिर महासंघा’चे सचिव श्रीजयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीरमेश शिंदे उपस्थित होते.

या वेळी अधिवक्ता विष्णु जैन म्हणाले कीमंदिरांचे पुनर्निर्माण करण्याच्या या मोहिमेत पुढील सूत्रे आमच्या संशोधनाचा केंद्रबिंदु राहिलयात विवादित स्थळाचे पौराणिक महत्त्वनष्ट केल्याची ऐतिहासिक साक्षखटल्याचा इतिहासपुरावे आणि कायदेशीर आधार आदींचा अभ्यास केला जाईलसंशोधनाअंती मंदिरे पाडली गेल्याचे सिद्ध झालेतर त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी आम्ही न्यायालयीन लढा चालू करूसध्या अनेक विवादित स्थळे पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या नियंत्रणाखाली असून सदर खाते अधिनियम 1958 कलम 16 च्या विरुद्ध कृती करत आहेएक सच्चा हिंदु या नात्याने अशा मंदिरांचे पुनर्निमाण करून भारताची सांस्कृतिक परंपरा पुनर्स्थापित करण्याची शपथ घेत आहोत.

या वेळी ‘भारत माता की जय’ संघटनेचे गोवा राज्य संघचालक श्रीसुभाष वेलिंगकर म्हणाले कीपोर्तुगिजांच्या काळात हजारांहून अधिक मंदिरे उद्धवस्त करण्यात आलीयातील दोन मंदिर चर्चच्या आक्रमणापासून वाचली असून यातील एक वरेण्यपुरी (वेर्णायेथील आणि दुसरे श्री विजयादुर्गा देवीचे मंदिर आहेहे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित म्हणून घोषित केलेले असतांनाही या मंदिराची भूमी गिळंकृत करण्याचे षडयंत्र चर्चच्या माध्यमातून चालू आहेया आक्रमणाच्या विरोधात हिंदू भाविकांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल !

 तरी या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारेतसेच ‘HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जाणार आहे.

Trending

Exit mobile version