गोवा खबर

टपाल विभागाची 22 जून रोजी विभागीय डाक आणि पेन्शन अदालत

Published

on

Spread the love

 गोवा खबर:टपाल विभागाकडून 22 जून 2022 रोजी, दुपारी 12 वाजता वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी यांच्या कार्यालयात डाक आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

टपाल सेवेसंबंधी पत्रसेवा, स्पीड पोस्ट, कुरिअर सेवा, बचत बँक, मनी ऑर्डर आणि निवृत्तीधारक यासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नाही, अशा तक्रारींची दखल या अदालतीत घेतली जाईल. अर्जदाराने तक्रारीचा पूर्ण तपशील कार्यालयाकडे 17.06.2022 पूर्वी पाठवण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

Trending

Exit mobile version