गोवा खबर

नाविकांना सूचना

Published

on

Spread the love

 गोवा खबर:बंदर खात्याने बाणस्तारी पुलाखालून कुंभारजूवा कॅनलातून  वाहतूक करण्यास परवानगी मागितलेल्या बार्जेस  स्वताच्या जोखिमीवर नियम  आणि अटींचे  पालन करून वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.

जुवारी नदीतून मांडवी नदीच्या बाजुने जाणाऱ्या माल भरलेल्या बार्जेसनी भरतीच्या एक तासाअगोदर    कुंभारजूवा कॅनलातून प्रवेश केला पाहिजे आणि मांडवी नदीतून जुवारी नदीच्या बाजुने जाणाऱ्या रिकाम्या बार्जेसनी योग्य भरती आणि सखोलतेचा अंदाज घेवून कुंभारजूवा कॅनलातून प्रवेश करावा.

परंतू माल भरलेल्या बार्जेसनी भरती आणि कमी भरतीचा वेळ पाहून मडकईच्या बाजुने जुवारी नदीच्या बाजुने वाहतूक करावी, असे  बंदर खात्याने कळविले आहे.

Trending

Exit mobile version