गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाने आज मडगाव येथे “जागतिक तंबाखू विरोधी दिना” निमित्त रॅलीचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला मडगाव नगरपालिकेचे अध्यक्ष श्री. लिंडन परेरा, एसजीडीएचच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपा कुरैय, जिल्हा नोडल अधिकारी एनटीसीपी डॉ. सारा जॉर्ज आणि विस्तार शिक्षक श्री. विशाल गावकर उपस्थित होते.
तंबाखूमुळे पर्यावरणाला होणारा धोका यावर भाषण करण्यात आले आणि जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. एसजीडीएच येथून रॅली एसजीपीडीए मार्केट मडगावकडे निघाली.